शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात मुख्यधिकारी कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

काही दुकानं सील केली जात आहे तर काही दुकानांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दंडाची रक्कम देखील कमी-जास्त आकारण्यात येत ...

काही दुकानं सील केली जात आहे तर काही दुकानांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दंडाची रक्कम देखील कमी-जास्त आकारण्यात येत आहे. काही बड्या व्यापाऱ्यांना दंडात झुकते माप दिले जात आहे तर छोट्या व्यापाऱ्यांकडून सरसकट दंड घेतला जात असल्याची तक्रार नवापूर मर्चेट सेवा असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

१५ मे संचारबंदीत वैधता पूर्ण होत आहे. नवापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढीवर अंकुश आला असून, परिस्थिती नियंत्रणात येत आहे. १६ मे पासून सर्व दुकानदारांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. दुकानदार व्यावसायिकांना फ्रंटलाईन वाॅरियर्स म्हणून मान्यता देण्यात यावी आणि दुकानदार व दुकानातील कामगारांसाठी स्वतंत्र लसीकरण व्यवस्था करण्यात यावी. संचारबंदीत व्यापारी हवालदिल झाले असून, त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वीजबिल पूर्ण माफ करावे, व्यापारी संकुलाचे भाडे माफ करावे. दुकानदारांवर कारवाई करण्यापेक्षा बाजारात विना मास्क होणाऱ्या गर्दीवर कारवाई करावी. तसेच अक्षयतृतीया व रमजान ईद येत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. गर्दी कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांना वाढीव वेळ देण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली.

नवापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना रॅपिड टेस्टिंग करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकाला संसर्ग होणार नाही व आपल्याला झालेल्या संसर्गाचे निदान होईल. कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी व्यापाऱ्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क, फिजिकल नंतर सॅनिटाईझरचा वापर करणे गरजेचे आहे. -मंदार कुलकर्णी, तहसीलदार नवापूर

नवापूर नगरपालिकेचे मुख्यधिकारी संचारबंदीत कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या व्यापाऱ्यांचा दंड कमी केला जात आहे तर साधारण व्यापाऱ्यांकडून सरसकट दंड केला जात आहे हे चुकीचे आहे. मुख्याधिकाऱ्यांनी सर्वांना समान न्याय देणे गरजेचे आहे अन्यथा व्यापारी संघटना आंदोलन करेल. - राजेश अग्रवाल, अध्यक्ष, नवापूर मर्चेट सेवा असोसिएशन