शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात मोकाट गुरांनी केले शहरवासीयांना हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट गुरांच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत. ही गुरे रस्त्यावरच ठिय्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट गुरांच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत. ही गुरे रस्त्यावरच ठिय्या मांडत असल्याने अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. नवापूर शहरातील गांधी पुतळ्यापासून दिवंगत हेमलता वळवी यांच्या पुतळ्यापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर रात्रीच्या सुमारास संपूर्ण रोड गुराने व्यापलेले असतो.या समस्येकडे पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. मोकाट गुरांबाबत अनेक तक्रारी नगरपालिकेत देण्यात आल्या आहेत. परंतु त्यावर काहीही उपाययोजना करण्यात आली नाही. मोकाट गुरांमुळे वाहनचालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. शहरात यापूर्वी कॉलेजरोड, लिमडावाडी, लाइट बाजार, सराफ गल्ली येथे रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या मोकाट गुरांमुळे दुचाकीस्वारांना भविष्यात आपले जीवही गमवावे लागले आहेत. बसस्थानक येथे ठिय्या मांडून बसलेल्या गुरांना वाहनचालक थांबवून त्यांना रस्त्यावरून बाजूला करत असतात.मोकाट गुरांबाबत केवळ प्रशासनाकडे बोट दाखवता येत नाही. याप्रश्नी गुरांचे मालकच अधिक बेजबाबदारपणे वागत आहेत. गुरांच्या मालकांनी गुरांना मोकाट सोडले नाही तर त्यांच्यामुळे उद् भवणाऱ्या समस्या कमी होतील. वाहनाच्या धडकेत गुरांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढू शकते. रात्रीच्या वेळी काळोखात रस्त्यावर उभी असणारी गुरे पटकन दिसत नाहीत. अवजड वाहनांच्या धडकेत गुरांवर वेळीच उपचार होत नाहीत. त्यामुळे गुरांचा जीव जाऊ शकतो. मोकाट गुरांबाबत आणखी एक समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करत आहे. ती म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या खाल्ल्याने त्यांचा होणारा मृत्यू. तसेच कचराकुंडी शेजारी तर मोकाट गुरे आणि भटके श्वान हमखास दिसून येतात. रात्री-बेरात्री दुचाकीस्वार किंवा वाटसरूंच्या मागे लागत हे श्वान मोठ्याने भुंकत पाठलाग करतात. वारंवार निदर्शनास आणूनही यांचा बंदोबस्त केला जात नसल्यामुळे गुरांच्या कळपाप्रमाणे त्यांना पकडणारे कर्मचारीही दुर्लक्ष करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक व नागरिकांतून उमटत आहे.

पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करागुरे तासान् तास सार्वजनिक ठिकाणी बसलेली असतात. त्यांच्या मल-मूत्रामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला  आहे. तर मल-मूत्रावरून वाहन घसरून अपघात घडण्याचही प्रकार येथे   घडतात, असे काही वाहनचालकांनी सांगितले. दरम्यान, ही जनावरे काही लोकांच्या मालकीची असतात. त्यामुळे पालिकेने त्यांना पकडून शहराबाहेर  कोंडवाडे तयार करून त्याठिकाणी रवानगी करावी. मोकाट गुरांच्या  बाबतीत स्थानिक नगरसेवकदेखील उदासीन आहेत. नगरसेवकांनी नागरी समस्या सोडण्यासाठी तत्पर असणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्या उदासिन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.