शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर व नंदुरबारात यंदा प्रथमच अतिवृष्टीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 15 दिवसांपेक्षा अधिक काळ दडी मारणा:या पावसाने शुक्रवारी पुनरागमन करत समाधानकारक हजेरी लावली होती़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 15 दिवसांपेक्षा अधिक काळ दडी मारणा:या पावसाने शुक्रवारी पुनरागमन करत समाधानकारक हजेरी लावली होती़ शनिवारी मध्यरात्रीनंतर रविवारी पहाटेर्पयत नंदुरबार आणि नवापुर या दोन तालुक्यात मुसळधार हजेरी लावल्याने यंदांच्या हंगामात प्रथमच अतीवृष्टीची नोंद झाली़ विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावणा:या पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील चार ते पाच गावात घरांचे नुकसान झाल़े   शनिवारी रात्री 11 वाजेपासून सुरु झालेल्या पावसामुळे नंदुरबार तालुक्यात सैताणे, खर्दे खुर्द, आखातवाडे या गावांमध्ये 15 घरांचे नुकसान झाल़े सकाळी तालुका प्रशासनाने नुकसानीचा आढावा घेत पंचनामा केला़ गत दोन दिवसात प्रथम सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतशिवारात पाणी साचल्याचे दिसून आले होत़े शनिवारी रात्र ते रविवार पहाटेदरम्यान नंदुरबार तालुक्यात 61, नवापुर 70, शहादा 28, तळोदा 39, अक्कलकुवा 47 तर धडगाव तालुक्यात 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े दोन आठवडय़ाच्या खंडानंतर पावसाने हजेरी दिल्याने पिकांवर मर येण्याचे संकट टळले आह़े कापसाला लागवडीनंतर पाणी मिळाल्याने शेतक:यांची चिंता मिटली असल्याचे दिसून आले आह़े रात्री उशिरार्पयत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबार तालुक्यासह शहरी भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता़ रविवारी दुपारनंतर ब:याच ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्यात कंपनीच्या अधिका:यांना यश आले होत़े पावसामुळे केवळ घरांचे नुकसान झाल्याची माहिती असून अद्याप कोणत्याही प्रकारे जिवितहानी झालेली नसल्याचे प्रशासनाने कळवले आह़े 

शहरातील ज्ञानदीप सोसायटीत राहणारे राजेंद्र नथ्थू पाटील यांच्या घरावरील पाण्याच्या टाकीवर वीज कोसळून पाण्याची टाकी फुटली़ वीजेच्या जबरदस्त झटक्यामुळे घरालाही तडे पडल़े विजेची तीव्रता अधिक राहिली असती तर मोठा अनर्थ घडला असता़ दरम्यान याचठिकाणी वाघेश्वरी देवीच्या टेकडाखालची माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून थेट ज्ञानदीप सोसायटीत आल्याने रस्त्यावर एक मीटरपेक्षा अधिक उंचीचा गाळ व मातीचा थर साचला होता़ यामुळे येथील रहिवासी पंडीत सावंत यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळली़ पावसामुळे ठिकठिकाणी दरडही कोसळल्याने या वसाहतीतील रस्ते बंद झाले होत़े सकाळी तालुका प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून पंचनामे करण्यात आल़े कोकणीहिल परिसरातही वीज कोसळल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान येथे कोणत्याही प्रकारे जिवित किंवा वित्त हानी झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आह़े पावसामुळे दुधाळे शिवारासह विविध भागात पाणी साचून होत़े यंदाच्या हंगामात प्रथमच अतीवृष्टी झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होत़े पावसामुळे नियोजित तालुका क्रीडा संकुल, करण चौफुली यासह विविध उंचसखल भागात पाणी साचून होत़े 

पावसामुळे आखातवाडे येथे पाच घरांचे नुकसान झाल़े सैताणे येथील वारु चैत्राम भिल, साहेबराव नामदेव पाटील, सिंदुबाई अजरुन पाटील यांची  पडून नुकसान झाल़े कोपर्ली येथे शेतक:याच्या शेतात पाणी घुसून काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आह़े प्रशासनाने त्या-त्या मंडळाचे मंडळाधिकारी आणि तलाठी यांच्या माध्यमातून पंचनामे करुन घेतले आह़े तालुका प्रशासनाकडून दिवसभर नुकसानीचा आढावा घेण्यात आला़