शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवलेला नेता हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

नंदुरबार : काँग्रेस नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ग्राऊंड लेव्हलचा कार्यकर्ता थेट ...

नंदुरबार : काँग्रेस नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ग्राऊंड लेव्हलचा कार्यकर्ता थेट राष्ट्रीय पातळीवर आपल्या नेतृत्त्वाची चमक दाखवतो, ही बाब महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आदर्श निर्माण करणारी होती, अशी भावना जिल्ह्यातील नेत्यांनी व्यक्त केली.

अभ्यासू नेते...

खासदार राजीव सातव यांच्या आकस्मिक निधनामुळे मन दु:खी झाले. ते माझ्यासाठी लहान भावासारखे होते. काँग्रेस पक्षाचे एक अतिशय तरुण, सक्रिय, अभ्यासू नेते होते. युवकांचे प्रेरणास्थान होते. त्यांनी पक्षात आणि आयुष्यात सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे समर्थन केले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही एक महान नेता गमावला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय नेते अहमद पटेल यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. आता खासदार सातव यांच्यासारखे उमदे नेतृत्व आपल्यातून गेले.

-ॲड. के. सी. पाडवी,

आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री.

सर्वसामान्यांचा नेता

एक ग्राऊंड लेव्हलचा नेता महाराष्ट्राने गमावला. तळागाळातील कार्यकर्त्यांची जाण असलेला नेता म्हणून खासदार राजीव सातव यांच्याकडे पाहिले जात होते. दिल्लीला गेलेला व हायकमांडशी जवळीक असलेल्या नेत्याचा स्वभाव बदलतो. परंतु खासदार सातव नेहमीच सर्वसामान्य नेते राहिले. त्यांच्या आई रजनी सातव व आपण एकाच वेळी विधान परिषदेत आमदार होतो. दिल्लीला कधीही गेलो तर ते हक्काने भेटत असत.

-चंद्रकांत रघुवंशी,

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान शिवसेना नेते.

पक्षात मोठी पोकळी

खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्याने काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य होते. अगदी प्रेमाने आणि आपुलकीने बोलायचे, मार्गदर्शन करायचे. ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक साहेबांचीदेखील विचारपूस करायचे, असे अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व हरपल्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, ते कधीही भरून न निघणारे आहे.

-शिरीषकुमार नाईक, आमदार, नवापूर.

उच्च प्रतिभेचा नेता

खासदार राजीव सातव यांच्या निधनाची बातमी दु:खदायक आहे. मी आमदार व मंत्री असताना त्यांचे व माझे मित्रत्त्वाचे संबंध होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील ते एक उच्च प्रतिभा असणारे नेते होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे न भरून येणारे नुकसान झाले. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला मोठ्या नेत्याला मुकावे लागले आहे. महाराष्ट्र नाही तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

-ॲड. पद्माकर वळवी,

माजी मंत्री.