शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यात पाऊस व गारपीटमुळे पावणे दोनशे हेक्टरवर पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

नंदुरबार : अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नंदुरबार तालुक्यात १७४ हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रात नुकसान झाले आहे. प्राथमिक स्तरावर पंचनामे करण्यात ...

नंदुरबार : अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नंदुरबार तालुक्यात १७४ हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रात नुकसान झाले आहे. प्राथमिक स्तरावर पंचनामे करण्यात आले आहेत. दरम्यान आमदार डॅा.विजयकुमार गावीत यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली व शेतकऱ्यांना दिलासा दिला.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसात अवकाळी पाऊस व काही भागात झालेल्या गारपीटमुळे शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, पपई, केळी, टरबूज या पिकांना फटका बसला आहे. नंदुरबारसह शहादा व तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक पंचनाम्यात साधारणत: ३०० हेक्टपर्यंत नुकसानीचा अंदाज आहे. त्यात काही भागात कमी अधीक नुकसानीचा समावेश आहे.

नंदुरबार तालुक्यात प्राथमिक पंचनाम्यात एकुण १७४.५७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये गहू १२.४५हेक्टर, पपई ८४.५१ हेक्टर, केळी ४९.९३ हेक्टर, मका ५.१८ हेक्टर, ज्वारी सहा हेक्टर, टोमॅटो दोन हेक्टर, हरभरा ४.५० हेक्टर, टरबूज पाच हेक्टर, मिरची पाच हेक्टर अशा क्षेत्रात नुकसान झाले आहे.

बुधवारी आमदार डॅा.विजयकुमार गावीत यांनी नंदुरबार तालुक्यातील कानळदे, बोराळे, काकर्दे, नाशिंदे, विखरण, सुजालपूर आदी परिसरातील नुकसानीची पहाणी केली.

यावेळी पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पाटील, शेखर पाटील, शांताराम पाटील, आर.डी.वळवी, विजय मोहिते, करणसिंग गिरासे, एम.एस.लाड, राजेंद्र गिरासे, मनोज पंदाणे, नायब तहसीलदार भिमराव बोरसे आदी उपस्थित होते. दिवसभर कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्याच्या कामात व्यस्त असल्याचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांनी सांगितले.

आमदार डॅा.गावीत यांनी अधिकाऱ्यांना विविध सुचना दिल्या.