शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:23 IST

नंदुरबार : जिल्ह्यात पुन्हा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी गावस्तरावर पथके स्थापन करण्यात ...

नंदुरबार : जिल्ह्यात पुन्हा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी गावस्तरावर पथके स्थापन करण्यात आली असून एका दिवसात ५० घरांचा सर्व्हे या पथकाला करावा लागणार आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी कोरोनाकाळात ‘माझे कुटुंब, माझी जबादारी’ या अंतर्गत दोन टप्प्यांत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात अनेक व्याधींचे रुग्ण निष्पन्न झाले होते शिवाय कोरोनाचे लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची पडताळणी होऊन त्यांना लागलीच उपचार मिळण्यास देखील मदत झाली होती. आता तशाच प्रकारचा सर्व्हे येत्या तीन दिवसांत करण्याचे निर्देश देण्यात आले असून काही गावांमध्ये त्याची सुरुवातदेखील झाली आहे.

पथकांची स्थापना

नंदुरबार तालुक्यात पथकांची स्थापना करून कामाला सुरूवात झाली आहे. पथकात गावातील शाळेतील शिक्षक, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांचा समावेश आहे.

कशाची होणार तपासणी

सर्व्हेक्षण अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची ताप, खोकला, दम लागणे, पल्स रेट, शरीरारील ऑक्सिजनची लेव्हल, एएलआय आणि सारी या आजारांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांचीही माहिती याद्वारे घेतली जाणार आहे.

जिल्ह्यातील अनेक रुग्णांना कोरोनाची लक्षणे असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करून उपचार घेण्यास उशीर करत असतात. आजार बळावल्यावर दवाखान्यात दाखल होतात. अशावेळी रुग्णाची प्रकृती खालावते. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त संशयित रुग्णांपर्यंत पोहोचणे व त्यांना संदर्भीय उपचार देणे हा उद्देश असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.