बदनामी करतो म्हणून एकाचा गळा दाबून केला खून, शहादा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST2021-07-10T04:21:58+5:302021-07-10T04:21:58+5:30

गुरूवारी संध्याकाळी हेमराज रतिलाल राठोड (२५) हा युवक गावातीलच ईश्वर पवार यांच्या घरासमोर गप्पा मारत होता. यावेळी ...

Murder by strangulation, incident in Shahada taluka | बदनामी करतो म्हणून एकाचा गळा दाबून केला खून, शहादा तालुक्यातील घटना

बदनामी करतो म्हणून एकाचा गळा दाबून केला खून, शहादा तालुक्यातील घटना

गुरूवारी संध्याकाळी हेमराज रतिलाल राठोड (२५) हा युवक गावातीलच ईश्वर पवार यांच्या घरासमोर गप्पा मारत होता. यावेळी त्या ठिकाणी शिल्या धर्मा भिल हा आला. यावेळी त्याने हेमराज यास “तुझ्याकडून मी कधी दोन हजार रुपये घेतले, माझी बदनामी का करतोस," असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केेली. दरम्यान, शिल्या याने हेमराज याचा गळा आवळल्याने काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. हेमराज याचा खून केल्यानंतर शिल्या याने छोटा चाकू काढून शिवीगाळ केली. यावेळी ईश्वर पवार हा भांडण सोडवण्यासाठी आला असता, शिल्या याच्या हातातील चाकू हातास लागून त्यांच्या हाताच्या बोटास दुखापत झाली.

याबाबत अनिल धर्मा पवार यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सशंयित शिल्या भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर म्हसावद पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी शिल्या भिल यास ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बिऱ्हाडे हे करीत आहेत.

Web Title: Murder by strangulation, incident in Shahada taluka