शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पालिका दरदिवशी लावते ३० टन कचऱ्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या काही वर्षात कचरा संकलन आणि त्याची विल्हेवाट यात नंदुरबार नगरपालिका समाधानकारक भूमिका बजावत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही वर्षात कचरा संकलन आणि त्याची विल्हेवाट यात नंदुरबार नगरपालिका समाधानकारक भूमिका बजावत असून यामुळे शहरातील कचºया ढिग नाहिसे झाले आहेत़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचरा व्यवस्थापन गांभिर्याने घेतले जात असून दरदिवशी शहरातून ३० टन कचरा संकलित करुन त्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़कोरोनाची धास्ती दिवसेंदिवस वाढत असताना स्वच्छता आणि उपाययोजनांना वेग आला आहे़ जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग जिल्हाभर बैठका घेऊन जनजागृती करत आहेत़ यात कचºयाचे व्यवस्थापन करुन त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे़ यात नंदुरबार नगरपालिकेने आघाडी घेतल्याचे चित्र सध्यातरी आहे़ पालिकेने खाजगी ठेकेदारासह पालिकेच्या सफाई कामगारांना नियुक्त करुन पहाटे सहा ते दुपारी १ व सायंकाळी सात वाजेनंतर कचºयाचे संकलन करण्याची पद्धत अवलंबली आहे़ यातून दिवसभरात ओला आणि सुका असा कचरा संकलित करुन त्याची विल्हेवाट लावली जात आहे़ असे असतानाही शहरात दिवसभरात मोकळ्या जागांवर कचरा टाकून घाण करणाऱ्यांची संख्याही कमी होत नसल्याचे चित्र आहे़ यातून मार्ग काढत पालिकेने जागोजागी कचरा कुंड्या ठेवल्याने कचºयाचे विस्थापन टळल्याचे दिसून आले आहे़ संकलित करण्यात येणार कचरा हा ओला आणि सुका अशा दोन वर्गवारीनुसार ठेवला जात असल्याने त्याची विल्हेवाट लावणे सोपे झाल्याची माहिती देण्यात आली आहे़एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे पालिका हद्दीतून वाहणारे नाले, पाताळगंगा नदी आणि गटारी यांची स्वच्छता करणेही गरजेचे असल्याचे चित्र दिसून आले आहे़ गटारींमध्ये साचणारी घाण आरोग्याला हानीकारक असल्याने त्याबाबत कारवाई करण्याची गरज आहे़ मोकाट वराह आणि कुत्रे यांच्याकडून घाण पसरवण्याचा प्रकार सुरु असल्याने समस्या वाढत असल्याची स्थिती आहे़ शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात गटारींमध्ये अडकलेले प्लास्टिक सांडपाण्याचे वहन थांबवत असल्याने त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़पालिकेकडून दर दिवशी ३० कचरा संकलित होतो़ यासाठी पालिकेचे १५६ तर ठेकेदाराकडून २१५ सफाई कामगार नियुक्त करण्यात आले आहेत़२० घंटागाड्या २ ढंपर आणि चार ट्रॅक्टरच्या सहाय्याने शहरातील विविध भागातून कचरा संकलन होते़साक्री रोडवरील डंपिग ग्राउंडमध्ये कचरा टाकल्यानंतर त्याचे विलगीकरण केले जाते़ यात ओला आणि सुका असे वर्गीकरण तसेच प्लास्टिक, डब्बे, चप्पल, पिशव्या, सॅनेटरी पॅडस, बॅटरी अशी वेगवेगळ्या प्रकारे विल्हेवाट लावण्यात येते़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून पालिका हद्दीतील सार्वजनिक जागांवर धूर फवारणी व औषध फवारणीला सुरुवात होणार असून रेल्वेस्थानक, बसस्टँड, रुग्णालये याठिकाणी प्राधान्य दिले जाणार काही ठिकाणी फवारणी सुरु करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे़