श्रमदानाद्वारे पाटचारीतील गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:50 PM2020-09-05T12:50:32+5:302020-09-05T12:50:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शासन व प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच केले पाहिजे या उक्तीने ...

The mud in Patchari was removed by labor | श्रमदानाद्वारे पाटचारीतील गाळ काढला

श्रमदानाद्वारे पाटचारीतील गाळ काढला

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शासन व प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच केले पाहिजे या उक्तीने कवळीद, ता.शहादा येथील शेतकऱ्यांनी श्रमदान करीत पाटचारीतील गाळ व पालापाचोळा काढून स्वच्छता केली. यासाठी कवळीद येथील शेतकरी पुरुषोत्तम पाटील व गिरधर पाटील यांनी आपल्या मालकीचे जेसीबी मशीन विनामूल्य उपलब्ध करून दिले.
शहादा तालुक्यातील काही भागात जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग व पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाटचाºया निर्माण केल्या होत्या. या पाटचाºयांमुळे बागायत क्षेत्रात वाढ झाली होती. परंतु काही काळानंतर या पाटचारींमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व पालापाचोळा साचल्याने त्या संपुष्टात आल्या आहेत. काही पाटचारींवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने त्या नामशेष झाल्या आहेत. तालुक्यातील कवळीद येथे गोमाई नदीपात्रातून मोठी पाटचारी काढण्यात आली आहे. कवळीद ते वरूळ कानडीपर्यंत ही २५ ते ३० किलोमीटर लांबीची पाटचारी आहे. या पाटचारीचा शेकडो कोरडवाहू शेतकºयांना लाभ होतो. म्हणून शेतकºयांच्या दृष्टीने ही पाटचारी संजीवनी आहे. सध्या गोमाई नदी काठोकाठ भरून वाहत असल्याने पाटचारीत पाणी वाहत आहे. मात्र काही दिवसांपासून गाळ साचल्याने पाणी बंद झाले होते. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. आलेला पाऊस वाहून जात असल्यामुळे उन्हाळ्यात कूपनलिका, विंधन विहिरींचीही पाण्याची पातळी खालावते. परिणामी बागायत शेतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी शेतीसाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी शासन व प्रशासनाची मदत न घेता स्वत:चे जेसीबी यंत्रासह स्वत:चा डिझेल खर्च करून पाटचारी खोदकामासाठी शेतकºयांनी श्रमदानाच्या माध्यमातून काम सुरू केले. पाटचारीत असलेला सर्व गाळ बाजूला सारत पाणी वाहण्यास पाटचारी मोकळी केली आहे. या उपक्रमासाठी पुरुषोत्तम पाटील व गिरधर पाटील यांना शैलेश पाटील, राजाराम पाटील, संजय पाटील, ओमकार पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील यांच्यासह अन्य शेतकºयांनी सहकार्य केले. पाटचारीच्या स्वच्छतेमुळे शेतीला पाणी मिळणार असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. या शेतकºयांनी केलेल्या कार्याची प्रेरणा ग्रामीण भागातील इतर शेतकºयांनाही मिळणार आहे.
 

Web Title: The mud in Patchari was removed by labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.