शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा ‘शॉक’; मीटर रीडिंग घेण्यास दिवसाचा उशीर, हजाराचा बसतो फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

वीज कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकाचे वीज मीटर रीडिंग हे प्रत्येक महिन्याच्या एक ते आठ तारखेपर्यंत घेण्यात येऊन त्यानंतर ...

वीज कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकाचे वीज मीटर रीडिंग हे प्रत्येक महिन्याच्या एक ते आठ तारखेपर्यंत घेण्यात येऊन त्यानंतर संबंधित ग्राहकाला मासिक वीज बिल पाठवावे, असे असतानाही नियमित कालावधीत मीटर रीडिंग घेतली जात नसल्याने यात वीज ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मुळात ग्राहकांची संख्या सर्वाधिक असली तरी त्या तुलनेत मीटर रीडिंग घेणाऱ्यांची संख्या अपूर्ण असल्यामुळे हा प्रकार घडत असावा, असा युक्तिवाद वीज कंपनीमार्फत करण्यात येत असला तरी कंपनीने मीटर रीडिंग घेण्यासाठी खाजगी ठेकेदाराला नियुक्त केले असून, ठेकेदार स्वतःच्या आर्थिक हितासाठी रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवत असल्याने बऱ्याच ठिकाणी मीटर रीडिंग हे १० ते १५ तारखेपर्यंत घेतले जाते. परिणामी ग्राहकाचे मागील महिन्यातील व चालू महिन्यातील १५ तारखेपर्यंतचे वीज युनिट मोजले जातात व त्यानुसार बिल आकारणी केली जाते. यामुळे सवलतीचा दर कमी वीज वापर करूनही ग्राहकाला मिळत नाही. याउलट वाढीव वीज दराने वीज वापर करावा लागत आहे.

ही घ्या उदाहरणे

माझा छोटासा व्यवसाय आहे. व्यावसायिक दराने पहिल्या १०० युनिटसाठी मला सात रुपये प्रतियुनिट अशी आकारणी केली जाते. माझा वीज वापर कमी असतानाही नियमितपणे दरमहा रीडिंग घेतली जात नसल्याने मला १०० पेक्षा अधिक युनिट येत असल्याने वाढीव दराने वीज बिल भरावे लागते. - साजिद मलिक, वीज ग्राहक.

आम्ही ग्रामीण भागात राहतो. नियमितपणे वीज मिळत नसली तरी दोन-तीन महिन्यांतून एकदा मीटर रीडिंग घेतली जाते. परिणामी विजेचा वापर कमी असतानाही वाढीव वीज बिल भरावे लागते. दरमहा मीटर रीडिंग घेतले गेले तर निश्‍चितच यात आम्हाला सवलतीच्या दरात वीज बिलाची आकारणी केली जाईल व आमचे आर्थिक नुकसान वाचेल. वीज कंपनीने कारभारात सुधारणा करणे आवश्यक आहे. - दित्या ठाकरे, वीज ग्राहक.

वीज कंपनीमार्फत ग्राहकांना वीज बिल दिले जाते. शहरातील बहुतांश भागात ऑटो मीटर रीडिंग घेतली जाते तर अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेतली जाते. एखाद्या ग्राहकास जास्तीचे बिल दिले असल्यास ते विभागून देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत नाही. मुदतीत रीडिंग घेतले गेले नाही तर अशा ग्राहकांनी वीज कार्यालयाशी संपर्क साधावा. वीज ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक कंपनीकडे नोंदवावा. प्रत्येक बिलावर किती दिवसांचे वीजबिल आहे याची नोंद असते. - बी.व्ही. जगताप, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, शहादा

शहरातील वीज ग्राहक संख्या

व्यावसायिक - ३०४७

कृषी - ७९००

रहिवासी - २६,२९५

औद्योगिक - ६४५

घरगुती वीज वापरासाठी पहिल्या १०० युनिटसाठी तीन रुपये ४० पैसे प्रतियुनिट वीजबिल आकारले जाते.

घरगुती वापरासाठी १०१ ते ३०० साठी सात रुपये ४३ पैसे प्रतियुनिट आकारणी केली जाते.

ज्या ग्राहकांचा मासिक विजेचा वापर हा १०० पेक्षा कमी युनिट आहे. मात्र, मुदतीनंतर रीडिंग घेतले जात असल्याने साहजिक त्यांचा वापर १०० पेक्षा अधिक होत असल्याने त्यांना पहिल्या १०० युनिटसाठी असलेल्या सवलतीच्या दराऐवजी जवळपास दुप्पट दर प्रतियुनिट आकारला जात असल्याने वीज वापर कमी करूनही नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. हा प्रकार वीज मीटर रीडिंग हे उशिरा होत असल्याने घडत आहे.

वीज मीटर रीडिंग नियमित होत नसल्याने ग्रामीण भागात कृषी वीज ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. परिणामी थकीत वीज बिलाचे प्रकार वाढत आहेत.

व्यावसायिक व औद्योगिक वापराचे दर सर्वाधिक असल्याने नियमित वीज मीटर रीडिंग घेतली गेली नाही तर वीज बिलात मिळणाऱ्या सबसिडीच्या लाभाला मुकावे लागते व वाढीव दराने वीज बिल भरावे लागते.