शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासक बसणाऱ्या सर्वाधिक ग्रा.पं. अक्कलकुवा तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 11:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : जानेवारी अखेर मुदत संपणा-या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आल्याने या ग्रामपंचायतींची लवकरच निवडणूक ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : जानेवारी अखेर मुदत संपणा-या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आल्याने या ग्रामपंचायतींची लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होईल अशी शक्यता आहे. सर्वाधिक २९ ग्रामपंचायती या अक्कलकुवा तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात लवकरच पुन्हा राजकीय हालचाली या माध्यमातून सुरू होणार आहेत.         शासनाच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,  सध्याची जगभर पसरलेल्या कोविड १९ हा साथीचा रोग  देशात तसेच महाराष्ट्रात संक्रमित होत असलेल्या निवडणूक आयोगाने पुढील आदेश पावेतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.           जानेवारी ते जून २०२१ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जशा जश्या संपतील तस-तसे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून       देण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आदेश काढला आहे. जानेवारी २०१९ अखेर  मुदत संपून प्रशासक नेमल्या जाणाऱ्या  ग्रामपंचायतीमध्ये शहादा तालुक्यातील वडछिल व शोभानगर या दोन ग्रामपंचायतीच्या सहभाग आहे. तर तळोदा तालुक्यातील धनपूर, रांझणी,अलवान,कोठार रतनपाडा, सावरपाडा, रामपूर, तऱ्हावद, गंगानगर, जीवननगर, सिलिंगपूर, खर्डी खुर्द,बेलपाडा, अमोनी, अंमलपाडा, खूषगव्हाण, खर्डी बुद्रूक, धवळीविहीर, रापापूर, चौगाव खुर्द या २०  ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. अक्कलकुवा तालुक्यातील आमली, आंबाबारी, ब्रिटिश अंकुशविहिर, दहेल ,गंगापूर, गव्हाळी, गुलीउंबर, होराफळी, हुणाखांब, जमाना, जांभीपाणी, काकडखुंट,कौली, खडकापाणी, खटवानी, कोराई मोगरा,मोरखी, नवानागरमुथा, नवापाडा, रामपूर, रायसिंगपूर, साकलीउमर सल्लीबार, सरी, तालंबा, ठाणाविहीर, उदेपुर, वालांबा या २९ ग्रामपंचायतीचा सहभाग आहे. धडगाव तालुक्यातील छापरी, खडक्या, सोन बुद्रुक, नंदलवड, राडीकमल, मनखेडी बुद्रुक, पालखा, तलई, मोख खुर्द, मोख बुद्रुक, चिखली वेलखेडी, अस्तंबा रेवेन्यू, पाडामुंड, सुरवाणी, भूजगाव,गोरंबा, मोडलगाव, असली, खांडबारा या २१ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. नवापूर तालुक्यातील कडवान मोठे, कडवान लहान, करंजी बुद्रुक, कामोद, खानापूर, चितवी, दापूर, देवळीवाडा(चि), नगारे, निजामपूर, निमदर्डा, बिलमांजरे, मेहंदीपाडा, मोवलीपाडा, वडसत्रा, वागदी या १९ ग्रामपंचायतीचा समावेश        आहे.दरम्यान, या ग्रामपंचायतींच्या निवडणुका मार्च महिन्यात होणार असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशाकीय तयारी सुरू करण्यात आली आहे. 

मार्च महिन्यात होणार रणधुमाळी... प्राशसक नियुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक ही मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने फेब्रुवारी महिन्यात मतदार यादी अंतीम करणे व इतर प्रशासकीय बाबींना सुरुवात होऊ शकते. सद्य स्थितीत ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. त्यातील २३ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. ६४ ठिकाणी निवडणुका सुरू आहेत.