सुरत व नाशिकसाठी सर्वाधिक ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST2021-05-25T04:34:27+5:302021-05-25T04:34:27+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ८० पेक्षा अधिक जणांनी ई-पास घेऊन विविध ठिकाणी प्रवास केला. सर्वाधिक प्रवास हे सुरत ...

Most e-passes for Surat and Nashik | सुरत व नाशिकसाठी सर्वाधिक ई-पास

सुरत व नाशिकसाठी सर्वाधिक ई-पास

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ८० पेक्षा अधिक जणांनी ई-पास घेऊन विविध ठिकाणी प्रवास केला. सर्वाधिक प्रवास हे सुरत व नाशिक येथे झाले. पास काढताना वैद्यकीय उपचाराचे कारण देण्यात आले. दरम्यान, ई-पास नसल्याने कुणावर कारवाई झाल्याची माहिती मिळू शकली नाही.

१५ एप्रिलपासून राज्यात संपूूर्ण संचारबंदी लागू झाल्यानंतर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन माहिती भरून पास उपलब्ध केला जातो. नंदुरबार जिल्ह्यातून परजिल्ह्यात ई-पास घेऊन महिनाभरात ८० पेक्षा अधिक जण गेले होते.

नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांची वैद्यकीय उपचारासाठीची मुख्य धाव ही गुजरात राज्यातील सुरतसह राज्यातील नाशिक येथे आहे. याशिवाय शैक्षणिक, रोजगार आणि इतर कामांसाठी पुणे, मुंबई व औरंगाबाद आणि जळगावकडे जिल्ह्यातील नागरिकांची धाव राहिल्याचे चित्र होते.

जिल्ह्यात विना ई-पास येणाऱ्यांवर कारवाईची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही.

Web Title: Most e-passes for Surat and Nashik