शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूदर ७.३५ टक्केपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाचवर पोहचली आहे. यामुळे मृत्यूदर वाढून तो ७.३५ टक्केवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाचवर पोहचली आहे. यामुळे मृत्यूदर वाढून तो ७.३५ टक्केवर पोहचला आहे. तर गेल्या आठवड्यात अचानक वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे बरे होण्याचा प्रमाण ५० टक्केच्या आत आले आहे. दरम्यान, नंदुरबारातील लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी बाजारातील गर्दीवर बºयापैकी नियंत्रण मिळाल्याचे दिसून आले. पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे झाल्याने हा परिणाम झाला.नंदुरबारात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झालेल्या अचानक वाढमुळे प्रशासनाने कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान नंदुरबारातील कोरोनाग्रस्त ७० वर्षीय वृद्धाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या पाचवर पोहचली आहे. त्यात दोनजण नंदुरबारातील आहेत.जिल्ह्यात बाहेर गावाहून आलेले अर्थात रेडझोनमधून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र गेल्या आठवड्यात दिसून आले. मुंबई येथून आलेल्यांनी जिल्ह्यात पुन्हा कोरोना फैलावला. अवघी ३४ आकडेवारी असलेल्या जिल्ह्यात सहा दिवसात आकडा ६८ वर गेला आहे. मृतांची संख्या ३ वरून ५ वर गेली आहे.बाहेरून आलेले...कोरोना नियंत्रीत असल्यामुळे जिल्ह्याची चर्चा राज्यात होत होती. प्रशासनानेही संपर्क साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. परंतु लॉकडाऊनमध्ये शिथीलता येताच बाहेरगावाहून नंदुरबारात येणाºयांची संख्या अचानक वाढली. येणाºयांपैकी अनेकांनी प्रशासनाला माहिती दिली नाही, आरोग्य तपासणी करून घेतली नाही. त्यामुळे अनेकजण कोरोनाबाधीत आढळले आहेत. त्यांच्या संपर्कातील इतरांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. काही अधिकारी तर धुळे, नाशिक येथून नंदुरबारला अपडाऊन करीत असल्यामुळे देखील आता धोका वाढला आहे. त्यामुळे अशा लोकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.लॉकडाऊनचे अस्त्रनंदुरबारात गेल्या आठवड्यात तब्बल २७ जण बाधीत झाले. वाढलेला हा आकडा चक्रावून सोडणारा होता. त्यातील एका कुटूंबात ७ तर दुसºया एका कुटूंबातील ६ जणांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाला लॉकडाऊनचे अस्त्र बाहेर काढावे लागले. मंगळवारपासून चार दिवस लॉकडाऊन सुरू करण्यात आले. परंतु सूट दिलेल्या कालावधीत नागरिकांची बाजारात होणारी गर्दी पोलीस आणि प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे. बुधवारी त्यावर बºयापैकी नियंत्रण मिळविता आले.१५ हजारांचा दंड वसूलनंदुरबार शहरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया आणि मास्क न लावणाºयांविरोधात नगर परिषदेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली असून बुधवारी दुपारपर्यंत १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.नगर परिषदेने कोरोना विषयक प्रतिबंधक उपययोजनांचा भाग म्हणून विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी याबाबत आदेश दिले होते. प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करणाºया नागरिकांना ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. येत्या काही दिवसात ही कारवाई अधिक कठोरपणे करण्यात येणार आहे. बुधवारी नियमांचे उल्लंघन करणाºया नागरिकांना व व्यावसायिकांना १५ हजार ५० रुपयाचा दंड करण्यात आला आहे.नागरिकांनी सोशल डिस्टिन्सिंगचे कटाक्षाने पालन करावे, दुपारी १२ नंतर अनावश्यक बाहेर पडू नये. चेहºयावर मास्क लावूनच बाहेर पडावे. व्यावसायिकांनीदेखील प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.बाबूराव बिक्कड यांनी केले आहे.

४नंदुरबारात मृतांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा ७.३५ टक्के झाला आहे. आतापर्यंत पाच जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यात नंदुरबारातील ७४ वर्षीय वृद्धा, ७० वर्षीय वृद्ध. शहादा येथील ३२ वर्षीय युवक, हिंगणी येथील ५१ वर्षीय पुरुष, तर लोणखेडा येथील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मृतांचे सरासरी वयोमान हे ५० ते ८० दरम्यानचे आहे. केवळ शहादा येथील एका युवकाचा समावेश आहे.४कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील वाढत्या आकड्यामुळे कमी झाले आहे. दोन आठवड्यापूर्वी बरे होण्याचे प्रमाण तब्बल ६८ टक्केपर्यंत होते. आता ते २० टक्केंनी कमी होऊन ४७ टक्केवर आले आहे. आजच्या स्थितीत ३१ जण कोरोनावर जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात उपचार घेत आहेत.