शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २०० पेक्षा अधीक शाळा खोल्या निर्लेखीत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २०० पेक्षा अधीक शाळा खोल्या निर्लेखीत करून पुढील शैक्षणिक वर्षापासून त्या नवीन बांधून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील २०० पेक्षा अधीक शाळा खोल्या निर्लेखीत करून पुढील शैक्षणिक वर्षापासून त्या नवीन बांधून देण्यासाठी नियोजन करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अशीच स्थिती अंगणवाडी इमारतींची देखील असून त्याबाबतही निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.जिल्ह्यातील अनेक भागातील शाळा खोल्यांची अवस्था अतीशय दयनिय आहे. सर्वाधिक शाळा खोल्यांची दूरवस्था ही सातपुड्यातील दुर्गम भागात आहेत. या शाळा खोल्या बांधकामासाठी विविध योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील शैक्षणिक वर्षात यातील निम्मेपेक्षा अधीक शाळा खोल्या बांधून मिळतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे.कुडाच्या घरात...सातपुड्यातील अनेक गावांमधील शाळा या कुडाच्या घरात भरविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्याची मानसिकता राहत नाही. शिक्षकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुर्गम भागातील अशा गाव व पाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्यामुळे ही समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून बांबू शाळेचा प्रयोग राबविण्याचे ठरविण्यात आले, परंतु तो देखील यशस्वी होऊ शकला नाही. नंतर फायबर शिटपासून शाळा खोल्या बांधण्याचे ठरविण्यात आले परंतु त्यालाही अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही.पडक्या इमारती, गळके छतअक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ५० पेक्षा अधीक शाळा खोल्या या गळक्या आहेत. पावसाळ्यात शिक्षकांना प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्री लावून गळती थांबवावी लागते. अशा वेळी मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अशा शाळा खोल्या दुरूस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जातो, परंतु त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही.खापर व परिसरातील सपाटीवरील गावांमधील शाळा खोल्यांची अवस्था देखील दयनिय आहे. त्याबाबतही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.४पावसाळ्यात बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यातच बांधकामासाठी पाऊल उचलावे लागणार आहे. त्यामुळे लवकर निर्णय घेवून बांधकामास सुरुवात होणे अपेक्षीत आहे. परंतु तसे होणे सध्या तरी शक्य नसल्याची स्थिती आहे. परिणामी पुढील वर्षी तरी शाळा खोल्या मिळतील की नाही ही शंकाच आहे.