शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

आमदार शिरीष नाईक करणार नवापूर शहराचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

या वेळी आमदार शिरीषकुमार नाईक यांनी नवापूर शहरातील सुधारित ५४ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजुरी मिळण्याबाबत पाठपुरावा करण्याबाबत आश्वासन दिले. ...

या वेळी आमदार शिरीषकुमार नाईक यांनी नवापूर शहरातील सुधारित ५४ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजुरी मिळण्याबाबत पाठपुरावा करण्याबाबत आश्वासन दिले. यानंतर शहरातील स्वस्तिक मिल जवळील फरशी पुलावर नवीन मोठा पूल बांधणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाजवळील रंगावली नदीवरील पूल बांधणेबाबत निधी मंजूर करण्यात येईल. तसेच शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पंप हाऊस येथे रंगावली नदीवर नवीन केटिवेअर बांधकाम करणे कामी जलसंपदा विभागाकडून आवश्यक निधी प्राप्त करून घेण्यात येईल. तसेच शहरातील जवळपास आठ ते १० मुख्य रस्ते नवीन करणे कामी शासनाचा रस्ता निधी व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी प्राप्त करण्यात येईल.

शहरातील मुख्य नेहरू उद्यान, नाना -नानी पार्क तसेच रहिवास विभागातील खुल्या जागांना कंपाऊड करून त्या विकसित करण्यात येतील. नवापूर शहरातील प्रत्येक प्रभागात आवश्यक त्या ठिकाणी जिम साहित्य बसविण्यात येतील. तसेच देवलफळी महामार्ग पुलापासून ते केटिवेअरपर्यंत संरक्षक भिंत विकसित करण्यात येईल. नगरपरिषदेतील रिक्त पदांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करुन संवर्ग कर्मचारी व नगरपरिषद कर्मचारी यांची शासन मंजुरीने भरती करण्यात येईल. नागरी आदिवासी वस्तीसुधार योजनांतर्गत आदिवासी प्रभागात विविध विकास कामासाठी जवळ पास दोन कोटी रुपये मंजूर करणेकामी पाठपुरावा करण्यात येईल. शहरातील एकमेव दिगंबराव पाडवी क्रिक्रेट ग्राऊंड तसेच क्रीडासंकुल विकसित करणे कामी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती आमदार शिरीष नाईक यांनी उपस्थित नगरसेवक-नगरसेविका यांना दिली. या आढावा बैठकीत आमदार शिरीष नाईक यांचा सत्कार नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी केला. या वेळी नवापूर नगरपालिकेचे मुख्यधिकारी महेश चौधरी, प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, पाणीपुरवठा अभियंता सचिन अग्रवाल उपस्थित होते.

उन्हाळ्यात पाणीटंचाई होणार नाही

रंगावली धरणापासून नवापूर शहरापर्यंत पाईपलाईन बसवल्याने नवापूर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटणार आहे. भीषण पाणीटंचाई मे अखेर निर्माण होते. त्यावेळेस नगरपालिकेला लाखो रुपये खर्च करून आवर्तने मागवावी लागतात. पाईप लाईन केल्याने पाण्याची बचत व उपलब्धता वाढणार आहे. यामुळे नगरपालिकेचा खर्चदेखील कमी होईल.

नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागात विविध योजनेच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने नवापूर शहरातदेखील नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शहराचा विकास मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून, लवकरच विकास कामांना शुभारंभ होईल. -शिरीष कुमार नाईक आमदार नवापूर

नवापूर शहराला स्वच्छ व सुंदर नगरी बनवण्याचा मानस असून, काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीष नाईक मोठ्या प्रमाणात नगरपालिका प्रशासनाला विविध विभागातून निधी उपलब्ध करून देणार आहेत. या निधीतून शहराचा विकास करण्यात येणार असून, यातून नवापूर शहराचा विकास करण्यात येईल. - हेमलता पाटील, नगराध्यक्षा न.पा नवापूर