शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थीचे खोटे प्रस्ताव बनवून गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीत तत्कालीन ग्रामसेवकाने वैयक्तिक शौचालय बांधकामात लाभार्थीचे खोटे प्रस्ताव तयार करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीत तत्कालीन ग्रामसेवकाने वैयक्तिक शौचालय बांधकामात लाभार्थीचे खोटे प्रस्ताव तयार करून अनुदान प्राप्त करून घेतले. या गैरव्यवहाराची दखल घेत नवापूर पं.स.चे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी तत्कालीन ग्रामसेवक दौलत रतन कोकणी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.तालुक्यातील खडकी येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सन 2014 ते 2019 या कालावधीत ग्रामपंचायतीतर्फे झालेल्या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार खडकी येथील सुजित दिनकर गावीत व ग्रामस्थांनी वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर केली होती. याबाबत ‘लोकमत’नेही वृत्त प्रसिद्ध केले होते. वरिष्ठ स्तरावरून याबाबत चौकशीचे आदेश काढण्यात आल्याने तीन लाभार्थीची  चौकशी केली असता त्यात अंकुश देवल्या गावीत यांच्या घराजवळ वैयक्तिक शौचालय बांधण्याच्या ठिकाणी सध्या जुने बांधकाम केले. बाथरूम असून वैयक्तीक शौचालय बांधलेले नाही. ग्रामपंचायतीने खोटा प्रस्ताव तयार करून अनुदान प्राप्त केल्याचे सिद्ध होते. हे अनुदान 12 हजार रुपये लाभधारकास मिळालेले असून एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याबाबत जवाब नोंदविला आहे. दुसरा लाभार्थी अमरसिंग देवल्या गावीत यांनी जवाब नोंदविला आहे की, वैयक्तीक शौचालय दोन महिन्यापूर्वी बांधलेले असून वापरात आहे. त्यामुळे आठ दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने 12 हजार रुपयांची रोख रक्कम दिली आहे. प्रत्यक्ष पाहणीअंती जुनेच वैयक्तिक शौचालय बांधकाम असल्याचे दिसते. या अनुदानाचा प्रस्ताव खोटा अहवाल प्राप्त करून घेतला, असे येथे सिद्ध होते. तिसरा लाभार्थी सुरुपसिंग भाऊराव कोकणी यांना विशाल नाईक या मक्तेदाराने वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी विटा, रेती, पत्रा, दरवाजा दिला असून शौचालय बांधून दिलेले नाही. त्यामुळे खोटा प्रस्ताव सादर करून अनुदान प्राप्त केल्याचे सिद्ध होते. तत्कालीन ग्रामसेवक यांच्याकडे दस्तावेज अद्याप असल्याने अनुदान कधी प्राप्त झाले? त्याची पडताळणी करता आली नाही, असे  चौकशी अहवालात म्हटले आहेतत्कालीन ग्रामसेवक दौलत रतन कोकणी यांना बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, वैयक्तीक शौचालय बांधकामात वरील लाभार्थीचे  खोटे प्रस्ताव तयार करून अनुदान प्राप्त करून घेतल्याचे सिद्ध होते. ही बाब गंभीर स्वरूपाची व कर्तव्यात कसूर करणारी आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद (शिस्त व अपील) 1967 चे कलम तीनचे उल्लंघन केल्याने शिस्तभंगविषयक कारवाई का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा मागितला आहे. तसेच खुलासा न केल्यास कारवाई       करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीसीत बजावले आहे.