शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर उपचारांसाठी घेऊन गेेलेली बालिका बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील काकडद्याच्या घाटली-आगरीपाडा येथील मोत्या काल्या पटले हे ऊसतोड मजूर नोव्हेंबर महिन्यापासून तळोदा-बोरद ...

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील काकडद्याच्या घाटली-आगरीपाडा येथील मोत्या काल्या पटले हे ऊसतोड मजूर नोव्हेंबर महिन्यापासून तळोदा-बोरद रस्त्यालगत कढेल फाट्याजवळील शेतात वास्तव्यास आहेत. त्यांच्यासह १४-१५ कुटुंबीय असून ते ऊसतोडणीचे काम करतात.

मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हे ऊसतोड मजूर नेहमीप्रमाणे ऊस तोडून गाडीकाम करत होते. त्याच वेळी मुन्नी मोत्या पटले ही दहा वर्षीय बालिका रस्ता ओलांडून पलीकडच्या शेतात लहान चुलत भावासोबत पाणी भरण्यासाठी गेली होती. पाणी भरून ती रस्ता ओलांडत असताना मोडकडून तळोदाकडे भरधाव जाणाऱ्या काळ्या रंगाच्या दुचाकीस्वाराने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात मुन्नी काटेरी झुडपांमध्ये फेकली गेल्याने तिला जबर दुखापत झाली व तिच्या नाकातोंडातून रक्त येण्यास सुरुवात झाली. यानंतर भयभीत झालेल्या दुचाकीस्वारांनी मुन्नीला दवाखान्यात घेऊन जातो, असे सांगून मोटरसायकलवर बसवून परत मोड गावाच्या दिशेने घेऊन गेले.

हा सर्व प्रकार तिच्या सोबत असणाऱ्या लहान भावाने उसाची गाडी भरणाऱ्या मुन्नीच्या आईवडिलांना व सहकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर त्या सर्वांना तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी त्यांना रक्त सांडलेले आढळून आले व धडक देणारा दुचाकीस्वार मुलीला मोडकडे घेऊन गेल्याची माहिती दिली. त्यानंतर त्या सर्वांनी मोड येथील दवाखान्यात मुन्नीचा शोध घेतला, पण त्यांना कुठेही मुन्नी आढळून आली नाही. त्यांनी परिसरातील बोरद, तऱ्हावद, वैजाली, प्रकाशा इत्यादींसह परिसरातील गावातील दवाखान्यात मुन्नीचा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता त्यांना अशा प्रकारच्या अपघात झालेल्या बालिकेला उपचारासाठी आणण्यात आले नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते दुचाकीस्वार अपघातात जखमी झालेल्या मुन्नीला नेमके कुठे घेऊन गेलेत याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळू न शकल्याने पटो कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे.

दरम्यान, या घटनेचा निरोप पटले कुटुंबीयांनी आपल्या मूळ गावी काकडदा येथे दिल्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व बुधवार सकाळपासून मुन्नीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र सायंकाळपर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मुन्नीच्या वडिलांनी बुधवारी दुपारी तळोदा पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती कळविल्यानंतर पोलिसांनीदेखील शोधकार्याला सुरुवात केली असल्याचे समजते. पोलिसांनी जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, या ठिकाणी भेटी देऊन याबाबत विचारपूस केली, मात्र मुन्नी आढळून आली नाही.

दरम्यान, अपघातग्रस्त मुन्नी नेमकी कुठे आहे व कशी आहे याबाबत पटले कुटुंबीय अनभिज्ञ असून मुन्नीची आई रडून बेजार झाली आहे. संपूर्ण काकडदा ग्रामस्थ चिंतातुर झाले असून मुन्नीचा ते शोध घेत आहेत. अपघातात जखमी झालेली मुन्नी बेपत्ता होऊन २४ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे.