शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मेगा टेक्स्टाईल आणि मेडिकल इक्विपमेंट पार्क सोडवतील रोजगाराची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

मनोज शेलार राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेले टेक्स्टाईल पार्क, डायमंड पार्क जिल्ह्यात उभेच राहिले नाहीत. केंद्र सरकारच्या माध्यमातून आता ...

मनोज शेलार

राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेले टेक्स्टाईल पार्क, डायमंड पार्क जिल्ह्यात उभेच राहिले नाहीत. केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पुन्हा मेगा टेक्स्टाईल व मेडिकल इक्विपमेंट पार्क आणण्याचा प्रयत्न होणार आहे. ही बाब जिल्हा विकासाच्यादृष्टीने आणि एकूणच रोजगार वाढविण्याच्यादृष्टीने चांगली आहे. त्याकरिता हे प्रकल्प नंदुरबारात लवकर सुरू होतील यासाठी ठोस पाठपुरावा होणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात रोजगाराचा मोठा अभाव आहे. एकही मोठा औद्योगिक प्रकल्प नाही. दोन साखर कारखाने सहकारी तत्त्वावर, तर एक कारखाना खासगी तत्त्वावर सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. नंदुरबार व नवापूरची एमआयडीसी अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे मोठे प्रकल्प या ठिकाणी नाहीत. शहाद्याची एमआयडीसी अद्यापही सुप्तावस्थेतच आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीच जिल्ह्यात उपलब्ध नाहीत. दरवर्षी सहा ते आठ महिने जिल्ह्यातून जवळपास ६० हजारापेक्षा अधिक मजूर परराज्यात व परजिल्ह्यात रोजगारासाठी स्थलांतर करतात. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराची साधने उपलब्ध झाली पाहिजेत, यासाठी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्याच अनुषंगाने नंदुरबारची एमआयडीसी मंजूर झाली आहे. आधी मंजूर झालेली एमआयडीसी टोकरतलाव रस्त्यावर खडकाळ व खदाणीच्या जागेवर होती. त्यामुळे ती विकसित होऊ शकली नाही. त्यानंतर आघाडी शासनाच्या काळात भालेर शिवारात नव्याने एमआयडीसी मंजूर करण्यात आली. त्या ठिकाणी विकसित करण्याचे काम आता सुरू असून लवकरच प्लॉट पाडून ते उद्योजकांना दिले जाणार आहेत. उद्योग-धंद्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. मात्र, या ठिकाणी अद्याप पाण्याची सोय उपलब्ध झालेली नाही. प्रकाशा बॅरेजमधून पाणी आणण्याचे आधी बोलले जात होते. परंतु त्यासाठीही पुढे काहीही प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे येथे उद्योजक कसे येतील, हा प्रश्नच आहे.

नवापूरच्या एमआयडीसीमध्येही पुरेशा सुविधा नाहीत. सुरत, अंकलेश्वर, वापी या ठिकाणी उद्योग क्षेत्र विस्तारण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे तेथील व्यावसायिक आपले सब युनिट नवापूर एमआयडीसीमध्ये सुरू करण्यास उत्सुक आहेत. परंतु या ठिकाणी सुविधा नसल्याने ते प्रस्ताव पुन्हा मागे घेतात. या ठिकाणी डायमंड झोन उभारण्याचाही प्रस्ताव होता. कारण सुरतचे अनेक हिरा उद्योग या ठिकाणी येण्यास उत्सुक होते. परंतु राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने त्यांना आकर्षित करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे एका चांगल्या विकसित एमआयडीसीचे स्वप्न येथे अपूर्णच राहिले आहे.

वास्तविक नंदुरबार व नवापूर शहर मध्य व पश्चिम रेल्वेला जोडणारी मध्यवर्ती रेल्वे स्थानके आहेत. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाले आहे. एक राष्ट्रीय महामार्ग व आता नव्याने चार राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जाणार आहेत. सुरत, इंदोरची कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी आहे. जिल्हा डी प्लसमध्ये असल्यामुळे उद्योजकांना येथे विविध सवलती मिळणार आहेत. परंतु उद्योजकांना येथे उद्योग आणण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी व आकर्षित करण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसून येत नसल्यामुळे जिल्ह्यात मोठे उद्योग आलेेले नाहीत, हीच मोठी दुर्दैवाची बाब आहे.

खासदार डॉ. हिना गावीत यांनी केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून नंदुरबारात मेगा टेक्स्टाईल पार्क आणि मेडिकल इक्विपमेंट पार्क आणण्याचे सुतोवाच केले आहे. त्यासाठी त्या दिल्लीत संबंधीत मंत्रालयात देखील पाठपुरावा करीत आहेत. यापूर्वी त्यांनी पाठपुरावा केलेले मेडिकल कॉलेज, महामार्गांची कामे व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांची कामे त्यांनी यशस्वी करून दाखविलेली आहेत. आता हे दोन मोठे प्रोजेक्ट जर खरंच नंदुरबारात सुरू झाले, तर जिल्ह्याच्या विकासात आणि रोजगार वाढीत भरच पडणार आहे. त्यासाठी मात्र ठोस पाठपुरावा होणे गरजेचे ठरणार आहे.