शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी शहाद्यात वृक्षमित्रांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

सर्व सामाजिक घटकांना आमंत्रित करून वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करावे. यात टेकडीवरील रहिवासी, परिसरातील अनरद, पुसनद, मोहिदा, ...

सर्व सामाजिक घटकांना आमंत्रित करून वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करावे. यात टेकडीवरील रहिवासी, परिसरातील अनरद, पुसनद, मोहिदा, सावळदा गाव व शहादेकर नागरिक यांच्या मदतीने वृक्षारोपण करावे. सातपुडा साखर कारखान्याकडून वृक्ष भेट म्हणून मिळणार आहेत, त्याचा वापर ठिकठिकाणी करणे. उपसमूह बनवणे जसे वृक्ष संवर्धन समिती, शासकीय योजना व अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन घेणे व त्यांना टेकडीवर आणणे. पाणीपुरवठ्यासाठी तांत्रिक समिती बनवणे. गावातून नारळाच्या काथ्था जमा करणे जेणेकरून ते वृक्षलागवडीस उपयोगी ठरतील. वेळ आल्यास वृक्ष जपवणुकीसाठी खासगी रखवालदार ठेवणे. दर रविवारी टेकडीवर पाच वाजता सभा आयोजित करणे. या चळवळीसाठी कोणीही आर्थिक मदत मागू नये. इच्छा असल्यास स्वखर्च वृक्षसंवर्धनासाठी करावा. ब्राम्हणपुरी येथील अनिल पाटील व अंशुमन पाटील हे या उपक्रमासाठी सहकार्य करणार आहेत. गांडूळ खताची मदत शहादा येथील जायन्टस ग्रुप करणार आहे. या वृक्षारोपण व संवर्धनासाठी महिलांची मदत घेतली जाणार असून समूहात महिलांना समाविष्ट करावे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. पहिला पाऊस पडला की प्रत्यक्ष वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य सुरू केले जाईल, असे प्रतिष्ठानतर्फे ठरविण्यात आले. वृक्षप्रेमी चिपको आंदोलनाचे प्रवर्तक सुंदरलाल बहुगुणा यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी तर आभार ज्ञानी कुलकर्णी यांनी मानले.

हनुमान टेकडी परिसरातील वृक्षारोपणासाठी कसे नियोजन करावे यासाठी वृक्षसंवर्धन विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. दोन दिवसीय सभेत प्रदीप पाटील, ज्ञानी कुलकर्णी, माधव पाटील, गुरुचरणसिंग राजपाल, अनिल साळुंखे, डॉ. विवेक पाटील, अतिन पटेल, भूषण बाविसकर, रमाशंकर माळी, लियाकत अली सैयद, खलील शाह, चतुर पाटील, विवेक भावसार, पुरुषोत्तम शिंपी, अनिल पाटील, किशोर चौधरी, चेतन गांगुर्डे, रोहन माळी, गणेश सोनवणे, सौरभ जहागीरदार, जगदाळे, संजय पाटील आदी उपस्थित होते.