शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

पपई दराबाबतची बैठक फिस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सध्या मार्केटमध्ये मंदी असल्याने वाढीव दर देणे परवडत नसल्याचे कारण व्यापाऱ्यांनी पुढे करत पपई ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सध्या मार्केटमध्ये मंदी असल्याने वाढीव दर देणे परवडत नसल्याचे कारण व्यापाऱ्यांनी पुढे करत पपई उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यात पपई दरासंबंधी झालेली बैठक फिस्कटली. व्यापाऱ्यांनी नऊ रुपयांच्यावर दर देण्यास नकार दिला. शेतकºयांच्या वतीने ११ रुपये प्रती किलो दराची मागणी करण्यात आली. परंतु व्यापारी आपल्या मतावर ठाम असल्याने बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपईच्या दराबाबत तिढा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती. बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, संचालक रवींद्र रावल, पपई उत्पादक समन्वय समितीचे भगवान पाटील, माधव पाटील, सतीश पाटील, उमेश पाटील, दीपक पाटील आदींसह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते. सध्या बाजारपेठेत पपईला मागणी असूनही व्यापारी शेतकºयांना वेठीस धरून लूट करीत आहेत यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीत शेतकºयांनी ११ रुपये दराची मागणी केली. परंतु व्यापाºयांनी त्यास विरोध करत नऊ रुपयांच्यावर दर देण्यास नकार दिल्याने बैठक फिस्कटली. इतर बाजारपेठेतील दरांची तुलनाही करण्यात आली. परंतु स्थानिक पपई खरेदीदार व्यापारी शेतकºयांना वाढीव दर देण्यास नकार दिला. अखेर शेतकºयांनी पपई तोड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जो व्यापारी अपेक्षित दर देईल त्याच व्यापाºयांना पपई द्यावी अन्यथा पुढील निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्यात यावा, असा निर्णय समन्वय समिती व शेतकºयांनी घेतला. दरम्यान, यंदा वातावरणाच्या बदलामुळे लागवड उशिरा झाली. त्यामुळे फळधारणाही उशिराने सुरुवात झाली. आता काही शेतकºयांचे उत्पादन निघायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सहाजिकच हंगाम लांबला. त्याचा गैरफायदा व्यापारी उचलत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. दरवर्षी मात्र यावेळेस हंगामाचा शेवट असतो. पपई खरेदीदार व्यापाºयांनी शेतकºयांना वेठीस न धरता अपेक्षित दर द्यावा, अशी मागणी होत आहे.