शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : घरासमोर आरडाओरड करून टिंगलटवाळी का करतात अशी विचारणा केल्याचा राग येऊन शहरातील गरीब-नवाज कॉलनीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : घरासमोर आरडाओरड करून टिंगलटवाळी का करतात अशी विचारणा केल्याचा राग येऊन शहरातील गरीब-नवाज कॉलनीत दोन गटात हाणामारी झाली. यात लाठ्याकाठ्यांसह कुºहाडीचा वापर करून हल्ला करण्यात आल्यामुळे तीन जण जखमी झाले. शहादा पोलिसात याबाबत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून सात संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.शहरातील गरीब-नवाज कॉलनीत रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास न्यू नशीब मेन्स पार्लर या सलून दुकानावर वसीम पठाण यांचा लहान भाऊ आदील हा कटींग करण्यासाठी गेला होता. तेथे ओट्यावर मित्रांसह बसलेला असताना दुकानासमोर रहाणाऱ्या मजाज पिंजारी याने त्यांना शिवीगाळ करून हाकलून दिले. आमच्या भावाला शिवीगाळ का केली अशी विचारणा वसीम पठाण करायला गेले असता त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कुºहाडीने डोक्यास गंभीर दुखापत केली. यात वसीम खान पठाण हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वसीम यांच्या फिर्यादीवरुन मजाज बशीर पिंजारी, इमरान शाहीद पिंजारी व नसीमबी शाहीद पिंजारी या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तर दुसरी फिर्याद इम्रान पिंजारी याने दिली असून त्यात म्हटले आहे की, रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास माझी आई नसीमबी पिंजारी ही घरात साफसफाई करीत असताना ओट्यावर आली असता तेथे काही युवक टिंगल-टवाळी व आरडाओरड करीत होते. आम्ही त्यांना तेथून हटकले. याचा राग येऊन वसीम खान पठाण व अनस खाटीक या दोघांनी माझ्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराशेजारील गटारीत ढकलले. त्याचवेळी माझे मामा मजाज पिंजारी हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना वसीम व अनसने कुºहाडीने मारहाण करून जखमी केले. यात इमरान पिंजारी व नसीमबी पिंजारी हे दोन्ही जखमी झाले आहेत. दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत इम्रानने दिलेल्या फिर्यादीनुसार वसीम अक्रम पठाण, अनस खाटीक, आदिल पठाण व अक्रम पठाण या चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपनिरीक्षक विक्रांत कचरे हे करीत आहेत.