शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यूमुळे तळवे आणि पिंपळोद येथे मध्यरात्रीच लावला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 11:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार/नंदुरबार : आयुष्यातून एकदाच येणारा विवाहाच्या क्षणाचा आनंद बाजूला ठेवत तळवे ता़ तळोदा येथील केदार कुटूंबियांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार/नंदुरबार : आयुष्यातून एकदाच येणारा विवाहाच्या क्षणाचा आनंद बाजूला ठेवत तळवे ता़ तळोदा येथील केदार कुटूंबियांनी जनता कर्फ्यूच्या आवाहनाला साद देत शनिवारी मध्यरात्री १२ वाजून पाच मिनीटांनी विवाह सोहळा आटोपून घेत जनजागृतीत सहभाग नोंदवला़ विवाह २२ रोजी दुपारी १२ वाजेचा असताना जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला़२२ मार्च रोजी तळवे ता़तळोदा येथील ग्राम पंचायत सदस्य सुरेश नारायण केदार व यांचा मुलगा दिपक केदार यांचा विवाह मोड ता़ तळोदा येथील नाना उंदा सूर्यवंशी यांची कन्या सपना यांच्यासोबत निश्चित करण्यात आला होता़ दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशातील नागरिकांनी जनता कर्फ्यूत सहभागी होऊन कोरोनामुक्त भारत करण्याचे आवाहन केले होते़ कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयाला तळवे ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता़ यातच तळवे येथे विवाह असल्याची माहिती सरपंच दशरथ बारीकराव, पोलिस पाटील भरत पटेल यांना मिळाल्यानंतर त्यांनी सुरेश केदार यांची भेट घेत माहिती दिली़ केदार कुटूंबांनेही यावर प्रतिसाद देत मध्यरात्री विवाह लावण्याचा निर्णय घेतला होता़ यावेळी आरोग्य सेविका सुरेखा वळवी आणि प्रताप वळवी यांनी मध्यस्थी केली होती़ केदार कुटूंबिय, नवरीकडील मंडळी तसेच गावात माहिती देऊन रविवारी मध्यरात्री विवाह सोहळा उरकला़ विशेष म्हणजे यावेळी आरोग्यसेविका सुरेखा वळवी आणि नवरदेव आणि नवरी यांनी उपस्थितांना कोरोनापासून बचाव करण्याचा सल्ला देऊन हात धुण्याचे महत्त्व पटवून दिले ़ यावेळी दोन्ही कुटूंबियांचे निवडक नातेवाई, नातेवाईक,गावातील प्रतिष्ठित नागरिक,व समाज बांधव असे केवळ ५० नागरिक उपस्थित होते़खैरवे ता़ शहादा येथील वर सुधीर भिमराव निकुंभ व पिंपळोद ता़ निझर येथील योगिता देविदास सामुद्रे यांचा विवाह रविवार २२ मार्च रोजी पिंपळोद येथे विवाह होणार होता़ परंतू जनता कर्फ्यूमुळे वधू वराकडील मंडळींनी हळदी समारंभातच शनिवारी रात्री विवाह उरकून घेतला़ यावेळी मोजकेच वºहाडी मंडळी उपस्थित होते़ निकुंभे व सामुद्रे परिवाराच्या या निर्णयाचा समाजात व पंचक्रोशीत स्वागत करण्यात आला़