शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

४० दिवसांनंतर भरली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मार्च महिन्यात बंद केलेली दुकाने व्यावसायिकांनी सोमवारी सकाळी सुरु केली़ ४० दिवसांच्या कालावधीनंतर विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मार्च महिन्यात बंद केलेली दुकाने व्यावसायिकांनी सोमवारी सकाळी सुरु केली़ ४० दिवसांच्या कालावधीनंतर विविध दुकाने सुरु झाल्याने बाजारात गर्दी उसळली होती़ यातून विविध भागात वाहतूक कोंडी होऊन पोलीस आणि नागरिक यांच्या तू-तू मै-मै झाल्याचे दिसून आले़आॅरेंज झोनमध्ये असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात अत्यावश्यवक सेवांसह विविध व्यवसाय सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती़ यातून सोमवारी सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत दुकाने सुरु ठेवण्याची मुदत देण्यात आली होती़ या पार्श्वभूमीवर सकाळी सातपासून शहरातील शास्त्री मार्केट, माणिक चौक, सुभाष चौक, गणपती मंदिर रोड परिसर, हाटदरवाजा, सिंधी कॉलनी, तहसील कार्यालय परिसर यासह विविध भागातील कापड दुकाने, चप्पल-बूट विक्री, मोबाईल दुकाने, हार्डवेअर, प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानांसह जनरल स्टोअर्स सुरु करण्यात आले़ शहरातील विविध भागात हातगाडी लावून वस्तू विक्री करणारेही सकाळी हजर झाले होते़ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री व्यतिरिक्त इतर दुकाने सुरु होणार असल्याने नागरिकही शहरात आले होते़ यातून हाट दरवाजा, उड्डाणपुल, एकलव्य हायस्कूल, स्टेशन रोड या भागात वाहतूक कोंडी झाली़ जुनी नगरपालिका परिसरात वाहने लावणाऱ्यांनी रस्त्यात वाहने उभी केल्याने पायी चालणेही मुश्किल झाले होते़वाहतूक शाखेकडून समज देऊनही नागरिक ऐकत नसल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली़ प्रशासनाने स्टेशनरोड भागात आखलेल्या जागांवर हातागाड्या लावल्या गेल्याने बाजारात कोंडी होत होती़ पोलीसांनी समज दिल्यानंतर काही गाड्या दुसºया रस्त्यांकडे वळवण्यात आल्या़४१२ वाजेनंतर व्यावसायिकांनी दुकाने बंद करावीत यासाठी पोलीस अधिकाºयांनी फिरुन सूचना केल्या होत्या़४बाजार सुरु झाल्याची माहिती ग्रामीण भागात मिळाल्यानंतर तेथून महिला आणि पुरुष दुचाकी व तीनचाकी वाहनांनी शहरात येत होते़ प्रारंभी बहुतांश आदिवासी महिलांनी बँकांबाहेर गर्दी करुन रांगा लावल्या होत्या़ पैसे काढून बाजार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या मातांना बँकेबाहेरच दुपार झाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे दिसून आले़वाहतूक शाखेकडून बेशिस्तपणा करणाºया वाहनाधारकांवर कारवाई करण्यात आली़ यातून जुनी नगरपालिका चौकात बराच वेळ पोलीस आणि नागरिक यांच्यात वाद रंगले होते़ ग्रामीण भागातून आलेल्या काहींची वाहने जप्त करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती़सराफ बाजार सकाळी ९ वाजेपासून सुरु झाला होता़ परंतू तीन तासात म्हणावी तशी उलाढाल होऊ शकली नाही़ सर्वच व्यावसायिकांनी दुकानांची सफाई करण्यावर भर दिल्याने ग्राहकांची तुरळक संख्या होती़ काही ठिकाणी मोड देण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेले दिसून आले़मंगळवारी शहराचा आठवडे बाजार आहे़ हा बाजार होतो किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे़ प्रशासनाने बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी गर्दी होण्याची शक्यता आहे़सकाळी सर्वच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता़ थुंकणाºयांवर कारवाई करणारे पथकही दिसून आले नाही़