शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

मका पिकावर ओढावले ‘लष्करी’ अळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात अद्यापही पूर्ण क्षमतेने पाऊस बरसलेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत़ यात मका पिकावर लष्करी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात अद्यापही पूर्ण क्षमतेने पाऊस बरसलेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत़ यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ अळीला रोखण्यासाठी केलेले उपाय फोल ठरत असल्याने वाढत्या पिकांची दैना शेतकरी डोळ्याने अनुभवत आहेत़ जिल्ह्यात यंदा 31 हजार 928 हेक्टर क्षेत्रात मका पेरा होण्याचा अंदाज होता़ परंतू पावसाच्या दिवसांचे खंड वाढल्याने आजवर केवळ 26 हजार 861 हेक्टर क्षेत्रात मका पेरणी पूर्ण झाली आह़े अल्प वेळेत भरमसाठ वाढ असे गणित असलेल्या मकावर 15 दिवसात पाने खाणा:या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला होता़ यातून शेतातील येऊ घातलेले उत्पादन धोक्यात आल्याने शेतक:यांनी कृषी सहायक, पर्यवेक्षक आणि कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांना माहिती दिली होती़ त्यांच्याकडून गत 10 दिवसांपासून वाढत जाणारी लष्करी अळी घालवण्यासाठी प्रयत्न सुरु असले तरी अद्याप संपूर्ण यश मिळालेले नाही़ जिल्ह्यातील मका पिकांवर जागोजागी वाढत जाणा:या अळीला रोखण्यासाठी कृषी विभागाने तातडीने पावले उचलण्याची अपेक्षा शेतक:यांची आह़े पानानंतर पिकाचा ‘पोंगा’ खाऊन टाकणा:या अळीमुळे उत्पादनच येऊ शकत नसल्याने शेतक:यांची मेहनत वाया जाणार असल्याचे चित्र आह़े तूर्तास जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अळीचा प्रादुर्भाव असल्याची माहिती देण्यात आली आह़े अळी घालवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती देण्यात येत आह़े 

लष्करी अळी या नावाने सर्वश्रुत असलेली ही अळी सर्वप्रथम जुलै 2018 मध्ये कर्नाटक राज्यात दिसून आली होती़ त्यांनंतर सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात आणि मग सहा महिन्यांनी संपूर्ण भारतभर ही अळी वाढीस लागली आह़े अळी निर्माण करणारे पतंग एका रात्रीत 100 किलोमीटर प्रवास करुन अंडी देत असल्याने अळ्यांचा प्रादुर्भाव कमी कालावधीत झाल्याचे समोर आले आह़े नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भाग, नवापुर तालुक्यातील खांडबारा परिसर, प्रकाशा परिसर आणि धडगाव तालुक्याच्या दुर्गम भागार्पयत ही अळी पोहोचली आह़े पानावरच पतंगाने दिलेल्या अंडय़ातून बाहेर पडणारी अळी पानासह मक्याचा पोंगा खात असल्याचे तज्ञांना दिसून आले होत़े 

नंदुरबार तालुक्यात 4 हजार 522, नवापुर 5 हजार 936, शहादा 5 हजार 45, तळोदा 1 हजार 83, धडगाव 3 हजार 42 तर अक्कलकुवा तालुक्यात  6 हजार 45 हेक्टर क्षेत्रात मका लागवड पूर्ण झाली आह़े अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तज्ञांनी अनेक पर्याय शेतक:यांना सुचवले आहेत़ यात प्रामुख्याने स्पोडोप्टेरा अळीचे पतंग पाहणीसाठी एकरी पाच कामगंध सापळे लावावे, एकरी 10 पक्षीथांबे उभारावे, सापळा पिक म्हणून नॅपियर गवत 3-4 ओळीत आजूबाजूने पेरावे, स्पोडोप्टेंरा अळी सापळा पिकावर आल्यास 5 टकके निंबोळी अर्क किवा 1500 पीपीएम निमार्कची फवारणी करावी, वेळेवर कोळपणी, खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे, खत व्यवस्थापन करावे असे सुचवले आह़े अळ्या घालवण्यासाठी शेतक:यांनी लागवडीनंतर 30 दिवसात वाळू  आणि चुना यांचे मिश्रण तयार करुन पोंग्यात टाकावे.हाताने अळया, अंडी आणि अळीचे गुच्छांचा नाश करावा किंवा रॉकेलमिश्रित पाणी टाकावे.झपाटय़ाने वाढ होणा:या अळ्यांचा आजघडीस केवळ मकावर प्रादुर्भाव असल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू ही अळी तृणधान्यांनाही मारक आह़े