शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवर आता मका व ज्वारीही मिळणार अवघ्या एक रुपये किलोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना तब्बल १३ हजार २२७९ क्विंटल ज्वारी व १५ हजार ३५० क्विंटल मका ...

नंदुरबार : जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना तब्बल १३ हजार २२७९ क्विंटल ज्वारी व १५ हजार ३५० क्विंटल मका तर काही ठिकाणी ५१.५० क्विंटल बाजरीदेखील वाटप केली जाणार आहे. मार्च महिन्यात हे नियोजन असून अवघ्या एक रुपया किलोप्रमाणे त्याचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ७६ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

गेल्या वर्षी व यंदा मोठ्या प्रमाणावर ज्वारी, मका खरेदी करण्यात आला होता. तो शासकीय गोदामांमध्ये पडून आहे. त्यामुळे अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना त्याचा लाभ मिळावा यासाठी रेशनकार्ड धारकांना त्याचे वितरण गहू व तांदूळ प्रमाणे होणार आहे. मार्च महिन्यात त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ज्वारी तब्बल १३ हजार २७९ क्विंटल तर मका १५ हजार ३५० क्विंटल उपलब्ध आहे. याशिवाय काही ठिकाणी बाजरी देखील अर्थात ५१.५० क्विंटलपर्यंत उपलब्ध आहे.

तालुकानिहाय भरड धान्य पुढीलप्रमाणे खरेदी करण्यात आले होते. नंदुरबार तालुक्यात ज्वारी १० हजार ७६५ तर मका सहा हजार २६० क्विंटल, नवापूर तालुक्यात ज्वारी ६४.५० क्विंटल तर मका एक हजार ९३७ क्विंटल, तळोदा तालुक्यात २३६ क्विंटल ज्वारी तर २२.५० क्विंटल मका, अक्कलकुवा तालुक्यात ८७ क्विंटल ज्वारी तर ६० क्विंटल मका, धडगाव तालुक्यात ५६ क्विंटल ज्वारी तर ६६५ क्विंटल मका व शहादा तालुक्यात दोन हजार ७० क्विंटल ज्वारी तर सहा हजार ४०५ क्विंटल मका खरेदी करण्यात आला होता. याशिवाय शहादा तालुक्यात ५१.५० क्विंटल बाजरी देखील खरेदी करण्यात आली होती.

मार्च महिन्यात गव्हाऐवजी ज्वारी, मका व बाजरी दिली जाणार आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना ज्या प्रमाणे दर महिन्याला गहू व तांदूळ वाटप केेले जाते त्याचप्रमाणे हे भरड धान्य द्यावे लागणार आहे.

सर्वच रेशन धान्य दुकानांना हे भरड धान्य पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाभार्थींनी आपल्या रेशन दुकानातून ते खरेदी करावे, असे आवाहन देखील जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले.

लॅाकडाऊन आणि कोरोनाच्या काळात प्राधान्य व अंत्योदय कुटुंबांना मोठ्या प्रमाणावर रेशनचा धान्याचा लाभ मिळाला होता. एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्याचे वितरण केले जात होते. त्यामुळे अनेकांचे संसार सुरळीत सुरू राहिले.

आता तांदूळ व गहूऐवजी ज्वारी व मका दिला जाणार असल्याने अशा कुटुंबांची आणखी सोय होणार आहे.

रेशन दुकानात प्राधान्य व अंत्योदय कुटुंबांना भरड धान्याअंतर्गत ज्वारी व मका वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. काही ठिकाणी बाजरीही दिली जाणार आहे. मार्च महिन्याच्या नियतनात त्याचा समावेश राहणार आहे. लाभार्थी कुटुंबांनी त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे.

-महेश शेलार,

जिल्हा पुरवठा अधिकारी, नंदुरबार.