शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पालिका प्रशासनातर्फे गुरूवारी दुपारनंतर अचानक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पालिका प्रशासनातर्फे गुरूवारी दुपारनंतर अचानक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात येऊन रस्तावर उभ्या असणाऱ्या लॉरी धारकांवर ही कारवाई करण्यात आली.शहरात दोन महिन्यापूर्वी पालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. तीन दिवस कारवाई करीत ही मोहीम सुरू होती. या कालावधीत अनेक अतिक्रमण काढण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसापासून पुन्हा अतिक्रमण जैसे होत असल्याने पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत होता तर पालिका प्रशासनाने या मोहिमेत केवळ गरिबांचे अतिक्रमण काढले व धनिकांना संरक्षण दिले असा आरोप अतिक्रमणधारकांतर्फे केला जात असल्याने ही मोहीम वादात सापडली होती. या मोहिमेनंतर पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होत असल्याने पालिका प्रशासनाने ही मोहीम राबवून काय मिळवले असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. काही नगरसेवकांनी ही या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.गुरूवारी दुपारी चार वाजेनंतर मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात पालिका प्रशासनाने अचानक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. यात मुख्य रस्ता, बस स्थानक परिसर, दोंडाईचा रोड, स्टेट बँक चौक, पंचायत समिती परिसर व महात्मा फुले पुतळा परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांनी केलेले तात्पुरते अतिक्रमण मोहिदा रस्त्यावरील अतिक्रमण व बाजार चौक काझी चौक या भागातील अतिक्रमण काढण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत मोठ्या संख्येने अतिक्रमण काढले गेले.बसस्थानक परिसरात अतिक्रमण काढताना अतिक्रमण धारक व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी व नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर मोठा अनर्थ टळला. अतिक्रमण काढताना पालिका प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप या वेळी अतिक्रमणधारकांनी केला. या मोहिमेत रस्त्यावर व्यवसाय करणाºया हातगाडी चालकांवर ही कारवाई करण्यात आली.दरम्यान अतिक्रमण निर्मूलन पथक काझी चौकात आले असताना या ठिकाणी एका सलून धारकाने अतिक्रमण करून या परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह पाडून टाकत पक्के बांधकाम केल्याने याबाबत पालिका प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या भागाची पाहणी मुख्याधिकाऱ्यांनी करून सोमवारपर्यंत सदरचे पक्के बांधकाम स्वखर्चाने काढून घेण्याचे आदेश संबंधित सलून चालकास दिले.गुरूवारच्या मोहिमेत मुख्याधिकारी राहूल वाघ यांच्यासह स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, मिळकत व्यवस्थापक सचिन महाडिक, नगररचना अभियंता स्वप्निल वाडिले, सहायक अभियंता आशिष महाजन, अस्थापणा प्र.चेतन गांगुर्डे, सहाय्यक गोटू तावडे, बाधकाम सहायक अजिंक्य डोडवे, पोलीस प्रशासन, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी मोहिमेत सामील होते.