महाराणा प्रताप जयंती साध्या पद्धतीने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:10+5:302021-05-10T04:30:10+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू असून शासनाच्या नियमानुसार सर्व कार्यक्रमांना निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्या आधारावर तालुक्यातील सर्व राजपूत ...

Maharana Pratap Jayanti celebrated in a simple way | महाराणा प्रताप जयंती साध्या पद्धतीने साजरी

महाराणा प्रताप जयंती साध्या पद्धतीने साजरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू असून शासनाच्या नियमानुसार सर्व कार्यक्रमांना निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्या आधारावर तालुक्यातील सर्व राजपूत समाजबांधवांनी महाराणा प्रताप यांची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने आपापल्या घरात प्रतिमेचे पूजन करून व अभिवादन करावे, असे आवाहन राजपूत समाज मंडळातर्फे करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत समाजबांधवांनी साध्या पद्धतीने जयंती साजरी केली. समाजबांधवांनी शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने जयंती साजरी केल्याबद्दल राजपूत समाज मंडळाचे अध्यक्ष संजय राजपूत, उपाध्यक्ष भरतसिंग गिरासे, संचालक किशोरसिंग गिरासे, सचिव देवेंद्र गिरासे, ॲड.सुवर्णसिंग गिरासे, गणपत गिरासे, प्रतापसिंग गिरासे, रवींद्रसिंग गिरासे, इंद्रसिंग गिरासे, गोविंदसिंग गिरासे, आर.एल. गिरासे, कोषाध्यक्ष तखतसिंग गिरासे, चिंधू गिरासे, प्रकाश गिरासे, प्रा.जयपाल गिरासे आदींनी आभार व्यक्त केले.

Web Title: Maharana Pratap Jayanti celebrated in a simple way