वाघाळे येथून रोख रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:23 IST2019-12-15T12:23:20+5:302019-12-15T12:23:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील वाघाळे येथील उघड्या घरातून एकाने ४५ हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस शुक्रवारी ...

Lump the cash from Waghale | वाघाळे येथून रोख रक्कम लंपास

वाघाळे येथून रोख रक्कम लंपास


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील वाघाळे येथील उघड्या घरातून एकाने ४५ हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली़ पैश्यांसह चोरट्याने दुचाकीही चोरुन नेली होती़ परंतू पाठलाग झाल्याने ती सोडून त्याने पळ काढला़
वाघाळे येथील निर्मलाबाई चुनीलाल ठाकरे ह्या दुपारी घराबाहेर असल्याचा फायदा घेत विलास चंद्रसिंग साबळे रा़ मोग्राणी ता़ नवापुर याच्यावर याने प्रवेश करत घरात ठेवलेले ४५ हजार रुपये रोख आणि घराबाहेर असलेली दुचाकी घेऊन पळ काढला़ ही माहिती समोर आल्यनंतर निर्मलबाई यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पाठलाग केल्यानंतर संशयित विलास याने दुचाकी जंगलात टाकून पळ काढला़
याबाबत निर्मलाबाई ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन विलास साबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Lump the cash from Waghale