शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दरवाढीने होतोय तोटा तरीही कमी दरात करतो रोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

जिल्ह्यातील विविध भागात गेल्या काही वर्षात यांत्रिकी शेतीला प्राधान्य दिले जात आहे. यातून ट्रॅक्टरच्या आधारे शेतमशागत करण्यात येते. यातून ...

जिल्ह्यातील विविध भागात गेल्या काही वर्षात यांत्रिकी शेतीला प्राधान्य दिले जात आहे. यातून ट्रॅक्टरच्या आधारे शेतमशागत करण्यात येते. यातून अनेकांनी ट्रॅक्टर खरेदी करून घेत भाडोत्री पद्धतीने शेतमशागत करण्याचा व्यवसाय ग्रामीण भागात सुरू केला होता. यात बेरोजगार युवकांना मोठा लाभ झाला. दिवसेंदिवस वृद्धिंगत होणाऱ्या या व्यवसायाला मात्र डिझेल दरवाढीचा फटका बसला आहे. तब्बल ८२ रुपये प्रतिलीटर डिझेल मिळत असल्याने हे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सध्या शेती हंगामात पीक कापणीची कामे सुरू आहेत. येत्या काळात खरीप पेरण्या सुरू होणार आहेत. यातून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसोबत संबंध असल्याने जुन्याच दरांमध्ये शेतीकामे करून देण्यात अनेकजण पसंती देत हितसंबंध जपत आहेत.

ट्रॅक्टरच्या सहाय्याने तळोदा तालुक्यासोबतच शहादा तालुक्यातही कामे करत आहे. यातून शेतकरी बांधवांसोबत हितसंबंध निर्माण झाले आहेत. डिझेलचे दर वाढल्याने दिवसभरात डिझेलचा वाढीव बोजा होतो आहे. यात शेतकरी आधीच पैसे शिल्लक ठेवून टप्प्याटप्प्याने रक्कम देतात. यात दरवाढ करावी किंवा कसे याच्या विचारात आहे.

ट्रॅक्टरद्वारे पेरणीचा एकरी खर्च वाढला

तळोदा, शहादा, नंदुरबार, अ.कुवा व नवापूर तालुक्यात वेगवेगळ्या दरांनुसार ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यात येते. नवापूर तालुक्यातील काही भागात औजार बँकेसारखा उपक्रम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत नाहीत. परंतु इतर तालुक्यात मात्र अडचणी वाढल्या आहेत.

ट्रॅक्टरद्वारे एकरी पेरणीचा खर्च हा गेल्या हंगामापर्यंत पाच हजार होता. डिझेलचे दर वाढल्याने हा खर्च सहा हजारांपेक्षा अधिक होईल, अशी शक्यता आहे. याचा फटका शेतकरी बांधवांना बसतो आहे.

शेतक-यांचा पिक लागवडीचा एकरी खर्च वाढणार असल्याचा फटका हा येत्या खरीप हंगामात बसणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

-योगेश कृष्ण मराठे,

ट्रॅक्टरमालक,रांझणी, ता. तळोदा.

इंधर दरवाढीमुळे शेतीकामांना अडचणी येत आहेत. ट्रॅक्टरचालक-मालक सवलतीचे दर देत असले तरी येत्या हंगामात वाढीव पैसे द्यावेच लागणार आहेत. सर्वच शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागत व पेरण्या करून घेतात. यानंतरची कामेही याचप्रकारे करावी लागतात. ट्रॅक्टरचे महत्त्व वाढले आहे.

-उत्तम निंबा मराठे,शेतकरी, मोड ता. तळोदा.,

ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे निश्चित असे कोणत्याही प्रकारचे दर नाहीत. दरांमध्ये वाढ होण्याचे यंदापासून सुरू झाले आहे. डिझेलचे वाढते दर हे शेतकऱ्यांना अधिक मारक आहेत. येत्या काळात याचे दुष्परिणाम दिसून येतील. ही दरवाढ मागे घेतली गेली पाहिजे.

-सुधीर बुलाखी पाटील,

शेतकरी,मोड ता. तळोदा.