शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडी असल्याचे सांगून व्यापा-याला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 16:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  सीआयडी असल्याची बतावणी करून एकाची लूट केल्याची घटना नंदुरबार शहरात घडली आहे. भर दुपारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  सीआयडी असल्याची बतावणी करून एकाची लूट केल्याची घटना नंदुरबार शहरात घडली आहे. भर दुपारी बसस्थानक परिसरातील गजबजलेल्या चाैकात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.शहरातील दादावाडी परिसरात राहणारे ७० वर्षीय व्यापारी खेतमल मिश्रीलाल जैन हे सोमवारी दुपारी दुचाकीने बसस्थानक परिसरातून डीआर हायस्कूलकडे जात असताना महाराणा प्रताप पुतळ्याच्या पुढे अज्ञात व्यक्तीने त्यांना हात देऊन थांबविण्याचा इशारा केला. जैन यांनी थांबून विचारणा केल्यावर हिंदी भाषेत सीआयडी असल्याचे सांगून, चेकिंग सुरू असल्याने तुमचीही तपासणी करायची असल्याचा बनाव केला. दरम्यान, दोघांनी जैन यांच्या अंगावरील ५० ग्रॅम सोन्याची साखळी, चार ग्रॅमची अंगठी, मोबाइल व खिशातील डायरी रुमालात बांधवायाचे सांगून डिक्कीत ठेवण्याची सूचना केली. यानंतर अंगझडती घेण्याच्या बहाण्याने एकाने डिक्कीत ठेवलेल्या रुमालाचे गाठोडे काढून घेतले. दोघेही निघून गेल्यानंतर जैन हेही दुकानाकडे निघून गेले. त्याठिकाणी तपासणी केली असता, रुमालात बांधलेला सुमारे तीन लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाणे गाठत हा प्रकार कथन केला. याबाबत खेतमल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तोतयांविरोधात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.