शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचे आदेश ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्यात काही शिथीलतेसह लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ जुलै पर्यंत वाढ करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्यात काही शिथीलतेसह लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी या संदर्भातील आदेश निर्गमित केले असून त्यात मागील सर्व आदेशातील बाबींचाही समावेश आहे.सार्वजनिक ठिकाणी, कामकाजाचे ठिकाणी आणि बाहेर फिरताना चेहºयावर मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तित सहा फूटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. दुकानांमध्ये एकावेळी पाच पेक्षा अधिक ग्राहकांना अनुमती राहणार नाही.मोठे समारंभ किंवा सोहळ्यांना परवानगी राहणार नाही. लग्नकार्यात ५० पेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येता येणार नाही. खुली जागा, वातानुकूलीत नसलेले सभागृह, लॉन्सच्या ठिकाणी लग्नकार्यास अनुमती असेल. अंत्यसंस्काराच्या ठिकाणीदेखील ५० पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास नियमाप्रमाणे दंड करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू किंवा दारूच्या सेवनावर प्रतिबंध राहतील. कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक आहे. तसेच कामकाजाच्या ठिकाणचे नियमित निजंर्तुकीकरण करावे. कार्यालय प्रवेशाच्या आणि बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश आणि सॅनिटायझरचा उपयोग करावा.जीवनावश्यक वस्तू आणि सेवांची सर्व दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. मॉल्स आणि व्यापारी संकुलाव्यतिरिक्त इतर दुकाने सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहतील. ई-कॉमर्स सेवा सुरू ठेवण्यास अनुमती राहील. सद्यस्थितीत सुरू असलेले उद्योग आहे त्याप्रमाणे सुरू राहतील. बांधकाम आणि मान्सूनपूर्व कामे सुरू राहतील. हॉटेल आणि खानावळीतून घरपोच सेवेला परवानगी राहील. टॅक्सी किंवा कॅब, रिक्शा आणि चारचाकी वाहनाला वाहनचालकासह केवळ दोन प्रवाशांना अनुमती राहील. दुचाकीवर केवळ चालकाला प्रवास करण्यास अनुमती असेल. जिल्ह्यांतर्गत बससेवेला ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूकीस अनुमती असेल. अशावेळी शारिरीक अंतर आणि सॅनिटायझेशनच्या सूचनांचे पालन आवश्यक राहील. आंतरजिल्हा वाहतूकीस प्रतिबंध असतील.प्लंबर, इलेक्ट्रीशिअन, पेस्ट कंट्रोल आदी स्वयंरोजगारांना अनुमती राहील. गॅरेज आणि वर्कशॉपच्या ठिकाणी दिलेल्या वेळेनुसार दुरुस्तीची कामे करता येतील. घराबाहेर व्यायाम करताना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे लागेल. वृत्तपत्र मुद्रण आणि वितरणाला अनुमती राहील. शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांना अध्यापनाव्यतिरिक्त इतर कामांसाठी शाळा-महाविद्यालयात जाण्याची अनुमती आहे. सलून, स्पा, बार्बर शॉप, ब्युटी पार्लर दिलेल्या अटींचे पालन करून सुरू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.