बंद घराचे कुलूप तोडून 60 हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:07 PM2019-09-04T12:07:25+5:302019-09-04T12:07:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : म्हसावद येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी शिक्षक दाम्पत्याच्या घरातून 60 हजार 900 रूपयांचा ...

The lock of a closed house is broken by 60 thousand rupees | बंद घराचे कुलूप तोडून 60 हजारांचा ऐवज लंपास

बंद घराचे कुलूप तोडून 60 हजारांचा ऐवज लंपास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : म्हसावद येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी शिक्षक दाम्पत्याच्या घरातून 60 हजार 900 रूपयांचा ऐवज रोख रक्कमेसह लांबविल्याची घटना घडली. याबाबत म्हसावद पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सर्वत्र गणपतीची धूम सुरू असताना झालेल्या घरफोडीमुळे जनतेत खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, म्हसावद येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र सजन बैसाणे हे परिवारासह सुटीनिमित्त मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. तीच संधी साधून चोरटय़ांनी सोमवारी पहाटे  बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाट, लॉकर तोडून सर्वत्र सामान, कपडे अस्ताव्यस्त फेकलेले होते. चोरीत 20 हजार रुपये रोख रकमेसह 40 हजार 900 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरटय़ांनी लांबविले.  दरम्यान, सोमवारी रात्री बारा-एक वाजता श्रीरामनगरमध्ये चोरटे आले होते. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना पळावे लागले. पोलिसांत गुन्हा नोंद केला असून सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली   आसिफअली सैयद पुढील तपास करीत आहे.
 

Web Title: The lock of a closed house is broken by 60 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.