वडिलांच्या गुरूमंत्रानेच आयुष्य प्रकाशमान झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:17 PM2020-07-05T12:17:38+5:302020-07-05T12:17:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटत गेले आणि आपण घडत गेलो पण जीवनाला खऱ्या ...

Life was enlightened by his father's guru mantra | वडिलांच्या गुरूमंत्रानेच आयुष्य प्रकाशमान झाले

वडिलांच्या गुरूमंत्रानेच आयुष्य प्रकाशमान झाले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटत गेले आणि आपण घडत गेलो पण जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती वडीलांनी दिलेल्या शिक्षणाच्या गुरूमंत्राने. शिक्षणातूनच जीवन आणि समाज घडविता येतो. दीन दु:खी समाजाला प्रकाश देता येतो, असे आपले वडील यशवंत सोमजी पाटील हे नेहमी म्हणत आणि त्याच प्रेरणेने आपले आयुष्य प्रकाशमान केले असे, उद्योगपती रवींद्र पाटील सांगतात.
रवींद्र पाटील हे मुळ ब्राह्मणपुरी, ता.शहादा या छोट्याशा गावातील रहिवासी. सद्या मात्र ते पुण्यात सहा उद्योग चालवितात, अनेकांना त्यांनी रोजगार दिला, ग्रामीण भागातील हा तरूण उद्योजक आंतरराष्टÑीय बाजार पेठेतही आपली छाप निर्माण करीत आहे. आपल्या गुरू विषयी ते सांगतात. आपण एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. बालवयापासूनच आपली शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेता वडीलांनी आपल्याला उच्च शिक्षणासाठी प्रेरणा दिली. मुंबई सारख्या शहरात आयआयटीमध्ये शिक्षणासाठी पाठविले आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळत होती. पण उद्योग क्षेत्रात काम करण्याचा वडीलांनी सल्ला दिला. खूप संघर्ष करावा लागला पण संघर्षानंतरचे फळ चांगलेच असते त्याचा अनुभव आपणही घेतला. या काळात आई आणि पत्नीचेही खूप सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. खरे तर आयुष्याच्या टप्या टप्प्यात भेटणारे मित्र, मोठ्या लोकांची भेट, सोबत काम करणारे सहकारी यांच्याकडूनही खूप काही शिकायला मिळाले. जे-जे चांगले ते सर्वांकडून घेता आले आणि त्यातूनच आयुष्याचा पुष्पगुच्छ गुंफता आला.
बालपणीच आई-वडीलांनी दिलेली खरे बोलण्याची शिकवण आयुष्यात मोलाची ठरली.
कितीही संकट आले तरी त्याला शांतपणे सामोरे जाण्याची वडीलांची शिकवण महत्त्वाची ठरली.
स्वत:शी व आपल्या कामाशी प्रामाणिक राहण्याचा त्यांनी सल्ला दिला होता.
आयुष्यात घेणाºयापेक्षा देणारे व्हावे. दुसºयाला नेहमी मदत करावी ही शिकवण मिळाली होती.
शब्द तोलून बोलावे ही शिकवण आज उपयोगी ठरत आहे.

आपला जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील शिकलेले नसले तरी त्यांनी आपल्याला उच्च शिक्षणासाठी आग्रह धरला. त्यासाठी सातत्याने प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. विशेषत: वडीलांनी बालपणीच जे संस्कार व शिकवण दिली ती मनात कायम स्वरूपी कोरली गेली. त्या वेळी त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आयुष्यात जणू गुरूमंत्र बनले आणि त्यातूनच आयुष्य फुलत गेले आणि जीवन खºया अर्थाने प्रकाशमान झाले.

Web Title: Life was enlightened by his father's guru mantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.