शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा ढवळ्या मुक्त संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  तालुक्यातील ग्रामीण भागाबरोबरच गुजरात हद्दीतील शेत शिवारात अगदी दिवसा ढवळ्या मुक्त संचार करणाऱ्या नर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  तालुक्यातील ग्रामीण भागाबरोबरच गुजरात हद्दीतील शेत शिवारात अगदी दिवसा ढवळ्या मुक्त संचार करणाऱ्या नर बिबट्यास बुधवारी शहराजवळील निंभोरा शिवारात गुजरात वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. ही वार्ता हद्दीतील गावांमध्ये कानोकानी हचल्यानंतर बघ्यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान ही घटना व्यारा वनविभागास गावाकऱ्यांनी कळविल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यावर त्याची रवानगी गिरच्या जांगलात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार तळोदा शहराजवळील गुजरात हद्दीतील  निभोरा परिसरातील शेत शिवारात गेल्या पाच, सहा दिवसापासून अगदी दिवसा ढवळ्या बिबट्या मुक्त संचार करीत असल्याचे शेतकऱ्यांना निदर्शनास  आले होते. त्यामुळे मजूवर्गही बिबट्याच्या दहशतीमुळे कामाला येत नव्हते. साहजिकच शेतीची कामेही ठप्प झाली होती. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी निभोरा गावातील शेतकऱ्यांनी व्यारा वनविभागाकडे लेखी मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने निभोरा येथील शेतकरी विष्णू घुले यांचा कापसाच्या शेतालगत पाच दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात ग्रामपंचायतीने बकरा ठेवला होता. हा बकरा खाण्यासाठी शेतात लपलेल्या बिबट्याने आत प्रवेश करताच तो पिंजऱ्यात अडकला. हा प्रकार त्या शेता शेजारी असलेले शेतकरी संजय श्रीपत घुले हे उसाचे पाणी बदलण्याकरिता शेतात जात असताना बिबट्या पिंजऱ्यात्त अडकल्याचे निदर्शनास आले. ही घटना त्याने शेतमालक विष्णू याना सांगितली तेव्हा त्यांनी व्यारा वनविभागाचे वन क्षेत्रपाल आकाश पाडसाला याना भ्रमणध्वनीने कळविले. संपूर्ण बंदोबस्तासह अधिकारी तेथे दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर जेरबंद बिबट्याला तेथून वाहनाद्वारे गिरच्या जंगलात नेण्यात आले आहे. या वेळी परिसरात दहशत पसरवीत असलेला बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती कानोकाणी गेल्यानंतर निभोरा परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. अखेर बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेच्या निःश्वास सोडला. तथापि अजूनही एक नर व मादी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले

तळोदा वनविभागास देतोय गुंगारानिभोरा परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्यानंतर पाच दिवसातच गुजरात वनविभागाने दखल घेत शेतात पिंजरा लावत बिबट्याचा बंदोबस्त केला. परंतु तळोदा परिसरात गेल्या चार, पाच महिन्यापासून बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घालत पाळीव प्राण्यान बरोबरच माणसाचा जीव घेतला आहे. तरीही वनविभाग ठोस कार्यवाही करायला तयार नाही. बिबट्या त्यांना गुंगाराच देत आहे. केवळ ट्रॅप कमेराच सोपस्कार पाडले जात आहे. गेल्या आठवड्यात राजकीय व्यक्तीस अनुभव आल्यानंतर आता कुठे वनविभागाने चिनोदा शिवारात पिंजरा लावला आहे. परंतु अजूनही तो पिंजऱ्यात आलेला नाही.