शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मोरवड परिसरात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : मोरवड, ता.तळोदा येथील रस्त्यावर गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्या व त्याची दोन पिल्ले ...


लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : मोरवड, ता.तळोदा येथील रस्त्यावर गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्या व त्याची दोन पिल्ले फिरतानाचे काही शेतकऱ्यांनी पाहिले. या वेळी गाव शिवारात बिबट्या व दोन बछड्यांचा वावर असल्याचे वृत्त गावात पोहोचताच ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत वनविभागाला कळविण्यात आल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बिबट्या व त्याच्या दोन्ही बछड्यांच्या पायाचे ठसे घेतल्याने हे ठसे बिबट्याचा व दोन बछड्यांची असल्याची खात्री होताच वनविभागाने या परिसरात त्वरित ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
मोरवड ते धानोरा रस्त्यावरील अर्जुन पाडवी यांच्या शेताच्या बांधावर बिबट्या व दोन बछड्यांचा वावर असल्याचे मोरवडचे माजी उपसरपंच रणजित चौधरी, रखवालदार राजू पाडवी, दशरथ पाटील, भरत पाटील यांनी पाहिले असता त्यांनी त्वरित वनपाल एन.पी. पाटील, वनरक्षक विरसिंग पावरा, अमित पाडवी यांना घटनेचे वृत्त कळविले. या वेळी संबंधितांनी घटना स्थळी तत्काळ भेट देत बिबट्या व बछड्यांच्या पायांचे ठसे घेतले. या वेळी शहादा येथील गस्ती पथकही दाखल झाले होते. त्यांनी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहे. याप्रसंगी ग्रामस्थ व शेतकºयांनी या भागात पिंपरे लावण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.