शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे-नंदुरबार जिल्हा सीमेवर बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 12:15 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  धुळे व नंदुरबार जिल्हा सीमेवार साक्री वनक्षेत्राच्या हद्दीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची घटना सकाळी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  धुळे व नंदुरबार जिल्हा सीमेवार साक्री वनक्षेत्राच्या हद्दीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या बिबट्यावर साक्री वनक्षेत्र हद्दीत अंत्य संस्कार करण्यात आले. नंदुरबार वन परिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांना सोमवारी सकाळी सिंदबन परिसरात बिबट्या मयतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह भेट दिली असता, इसर्डे ता. साक्री शिवारात संजय हिराकरे यांच्या शेतात बिबट्या मयतावस्थेत आढळून आला. हा भाग साक्री तालुक्यातील असल्याने रघुवंशी यांनी साक्री तालुका वन परीक्षेत्र अधिकारी कैलास सोनवणे यांना माहिती दिली होती. सोनवणे यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्याची पाहणी करत पचंनामा केला. साक्री तालुक्याकडून नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा वनक्षेत्रात येताना पाणी न मिळाल्याने सहा वर्षीय वृद्ध बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान साक्री येथील पशुवैद्यकीय अधिकारी एस.आर.कोळेकर यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करत बिबट्याच्या शरीरातील विविध अवयवांचा व्हिसेरा काढून घेत नाशिक येथे तपासणीसाठी पाठवला आहे. ही कारवाई सहायक वनसरंक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्रपाल कैलास सोनवणे, वनरक्षक शितल तोरवणे, संजय पाटील, आबा बागुल, दाैलत खैरनार, नंदुरबारचे वन परिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी, वनपाल युवराज भाबड यांनी केली. दरम्यान येत्या काही दिवसात व्हिसेरा रिपोर्ट येणार असून त्याच्या अहवालानंतर बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा हे समजणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल कैलास सोनवणे यांनी दिली आहे. दरम्यान ठाणेपाडा शिवारात सध्या बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरू असल्याने या घटनेची चर्चा सुरू होती. परंतू मयत बिबट्या साक्री तालुक्यातून नंदुरबारकडे येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.