शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

लर्निंग लायसन्स ऑफलाइनच बरे; कार्यालयात पुन्हा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

नंदुरबार : परिवहन विभागाने घरबसल्या लर्निंग लायसन अर्थात शिकाऊ वाहन परवाना काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासह ...

नंदुरबार : परिवहन विभागाने घरबसल्या लर्निंग लायसन अर्थात शिकाऊ वाहन परवाना काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासह वितरक स्तरावरच वाहनांना क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील लर्निंग लायसन्सचा निर्णय चांगला असला तरी तांत्रिक अडचणींमुळे अर्जदार हैराण होऊन ऑनलाइन नको ऑफलाइनच बरे, असे सांगून आरटीओ कार्यालयात धाव घेत आहेत.

केंद्र शासनाने आदेश काढून आधारचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. यानुसार वाहन व सारथी ४.० प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल केलेले आहेत. यामुळे आरटीओ कार्यालयात न जाता घरूनच ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढणे व वाहन वितरकांच्या स्तरावरच वाहन क्रमांक जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढणे या निर्णयाची अंमलबजावणी होऊ लागली आहे. मात्र, हा निर्णय अर्जदारांसाठी त्रासदायक ठरत आहे. यामुळे अनेक जण प्रत्यक्ष कार्यालयात जात आहेत. नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आधीच कर्मचारी संख्या कमी असल्याने अनेकांची कामे योग्य वेळी होत नसल्याचा दावा केला जात आहे. कोरोनामुळे लायसन्स काढणे अत्यंत जिकिरीचे झाल्याचा अनुभव येथे येणाऱ्यांना येत असून कारवाईला गती देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ऑनलाइनसाठी अडचणी काय?

आरटीओ कार्यालयाने अर्ज करणाऱ्यांसाठी सर्व पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. असे असताना ऑनलाइन अर्जास अडचणी येत आहेत.

नाव, जन्मतारीख टाकल्यानंतर फोटो अपलोड होत नाहीत. एकाच वेळी सर्व्हरवर लोड येत असल्याने साइट बंद पडते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक जण आरटीओ कार्यालयात येऊन एजंटच्या माध्यमातून अर्ज करून भरून घेत आहेत. सातपुड्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून ऑनलाइन अर्ज करणे शक्यच नसल्याने तेथील नागरिक ऑफलाइन कामांसाठी येत आहेत. दरम्यान लायसन्ससाठीचे कॅम्पही कोरोनामुळे बंद करण्यात आले असल्याने नागरिकांना प्रवास करून नंदुरबार गाठावे लागते.

ऑनलाइनच होत नसल्याने परीक्षा रखडल्या

नंदुरबार जिल्ह्यातील नेटवर्क कनेक्टिव्हिटी या उपक्रमाच्या मुळावर उठली आहे. नेट चालत नसल्याने ऑनलाइन नकोच असा पवित्रा नागरिक घेत आहेत. यातून एजंटसोबत संपर्क करून कामकाज केले जात आहे. दरम्यान ज्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले त्या सर्वांनीच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा दिली नसावी, असा अंदाज आहे. अर्ज करणारा दुसरा अन् परीक्षा देणारा दुसरा अशी स्थिती असल्याचे समोर आले होते. यामुळे ऑफलाइन कामकाजास प्राधान्य दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकारी अद्यापही सुटीवरच...

नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव हे सध्या रजेवर असल्याने पदभार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांना पदभार देण्यात आला आहे. प्रभारीराजमुळे कार्यालयातील कामकाज हे मंदावले असल्याचे दिसून आले आहे.

९५ ऑनलाइन लायसन्स

जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ९५ जणांनी ऑनलाइन लर्निंग लायसन काढले आहेत. यासाठी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून लायसन मिळवले आहेत.

गेल्या महिन्यात ही सुविधा शासनाने सुरू केली. बायोमेट्रिक तसेच सर्व्हरमध्ये अडचणी येणे, अशा तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन लायसन्स निघू शकत नसल्याची माहिती दिली जात आहे.

ऑनलाइन लायसन्सची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली असली तरी दुर्गम भागात ही सुविधा काम करत नाही. म्हणून वेळोवेळी धडगाव ते नंदुरबार अशा चकरा मारत आहे. लर्निंग झाले आहे आता परमनंट लायसन्सची प्रतीक्षा आहे.

- राकेश पावरा, लायसन्सधारक

ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन काम होत असल्याने लायसनसाठी अर्ज केला आहे. तळोदा तालुक्यातही कधी कधी नेट चालत नसल्याने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे शक्य होत नाही. शासनाने आधी नेटची सुविधा बळकट करण्याची गरज आहे.

-विशाल पाडवी, लायसन्सधारक