महाविकास आघाडीचा फार्म्यूला नवापूर पालिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:15 PM2019-12-13T12:15:51+5:302019-12-13T12:15:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी येथील पालिका पोटनिवडणुकीतही पहावयास मिळाली. दोन पैकी एक ...

Leadership Development Formula in Navapur Municipality | महाविकास आघाडीचा फार्म्यूला नवापूर पालिकेत

महाविकास आघाडीचा फार्म्यूला नवापूर पालिकेत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी येथील पालिका पोटनिवडणुकीतही पहावयास मिळाली. दोन पैकी एक जागा कॉग्रेसच्या व दुसरी जागा सेनेच्या वाटेला आली आहे. भाजपा उमेदवार महाविकास आघाडी विरोधात लढत देत आहेत. दोन्ही जागांसाठी एकुण १० उमेदवारांनी आजअखेर नामांकन दाखल केले आहेत.
पालिकेच्या प्रभाग सहा (अ) व सात (अ) या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत असुन दोन्ही जागा नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग अश्या राखीव आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीत प्रभाग सहा (अ) ची जागा कॉग्रेसच्या वाट्याला तर सात (अ) ची जागा शिवसेनेला मिळाली आहे. प्रभाग सहा (अ) साठी फेमिदा फिरोज फेन्सी यांनी बुधवारी अपक्ष नामांकन दाखल केले होते. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे प्रभाग सहा (अ) साठी आज सुरेखा प्रकाश जगदाळे यांनी नामनिर्देशन पत्र भरले. शिवसेनेकडून प्रभाग सात (अ) साठी डॉ. मनोज रमेश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. कॉग्रेसचे पालिकेतील गटनेते आशिष मावची, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक अय्युब बलेसरीया, सुभाष कुंभार, धमु पाटील, शिवसेना जिल्हाउपप्रमुख हसमुख पाटील, शहर प्रमुख आबा मोरे, प्रविण ब्रम्हे,अनिल वारुडे, मनोज बोरसे, प्रकाश कुंभार, नितेश गावीत आदी होते. भाजपकडुन व अपक्ष म्हणुन प्रभाग क्रमांक सहा (अ) साठी नैन्सी राकेशकुमार मिस्त्री व जिग्नेशा संदिप राणा यांनी नामनिर्देशन पत्र भरले आहे. भाजप कडुन प्रभाग सात (अ) साठी महेंद्र अशोक दुसाने यांनी नामनिर्देशन भरले. भाजपचे नेते तथा माजी जि.प. अध्यक्ष भरत गावीत, एजाज शेख, रमला राणा, जितेंद्र अहिरे, प्रणव सोनार, समिर दलाल, रवि गावीत, दिनेश चौधरी आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक सात (अ) साठी अपक्ष उमेदवार म्हणून सुनिल धाकु भोई व गणेश भानुदास वडनेरे यांनी नामनिर्देशन भरले.
निवडणुक निर्णय अधिकारी महेश शेलार यांच्याकडे सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज सादर केले. १२ डिसेंबर २०१९ हा नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिवस होता. एकुण १० उमेदवारांनी दोन्ही जागांसाठी आजअखेर नामांकन दाखल केले आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शिंदे, कार्यालय अधिक्षक अनिल सोनार, कर निरीक्षक मनोज पाटील, भरत सोनार, रमेश सोनार यांनी काम पाहीले.

नवापूर तालुक्यातील राजकारणाचे समिकरणे बदलले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणुका देखील सुरू आहेत. या पोटनिवडणुकीचा निकाल व तयार होणारी समिकरणे ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील परिणामकारक ठरू शकतील अशी शक्यता आहे.

Web Title: Leadership Development Formula in Navapur Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.