शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

एलसीबीकडून अवैध गावठी मद्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील बंधारपाडा वडगाव हद्दीत गावठी दारुचा अवैध साठा एलसीबीच्या पथकाने जप्त केला़ विधानसभा निवडणूकीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील बंधारपाडा वडगाव हद्दीत गावठी दारुचा अवैध साठा एलसीबीच्या पथकाने जप्त केला़ विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली़ बंधारपाडा वडगाव हद्दीत विरचक धरणाचे किनारी तसेच बंधारपाडा गावात दोन ठिकाणी अवैध गावठी मद्याचा साठा असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ यानुसार त्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने दोन्ही ठिकाणी छापा टाकला असता 73 हजार 500 रुपयांचा गावठा हातीभट्टीचा व गावठी दारु गाळण्यासाठी उपयोगात येणारे रसायन, महू फूल मिळून आल़े हा साठा व साहित्य पथकाने नष्ट केल़े याठिकाणी वसंत भाऊराव वळवी, विशाल आखात्या पाडवी व हिरालाल बारक्या गावीत तिघे रा़ बंधारपाडा वडगाव यांना यांच्यावर नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल़े ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र पाडवी, विकास पाटील, रविंद्र पाडवी, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, पोलीस शिपाई राजेंद्र काटके यांनी केली़ 

एलसीबीच्या पथकाने पाच वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतल़े संपत महारु पाटील रा़ अकोले खुर्द ता़ माढा जि़ सोलापूर असे आरोपीचे नाव असून त्याने 2014 मध्ये सिंगपूर ता़ तळोदा हद्दीत जहांगीर रामजी वसावे यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिली होती़ घटनेनंतर संपत पाटील हा ट्रॅक्टरसह घटनास्थळावरुन फरार झाला होता़ पोलीस निरीक्षक नवले यांनी त्याची माहिती काढून शोध घेतला होता़ त्याला बुधवारी रात्री पोलीस निरीक्षक नवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, प्रमोद सोनवणे, किरण पावरा, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने ताब्यात घेत तळोदा पोलीस ठाण्याकडे सोपवल़े