नवापूर येथील वकील महिलेचा सासरकडून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:02 IST2020-09-25T13:02:19+5:302020-09-25T13:02:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वकीली करणार उच्च शिक्षित महिलेचा सासरी सुरत येथे छळ केल्याप्रकरणी पतीसह १७ जणांविरुद्ध गुन्हा ...

Lawyer from Navapur harassed by father-in-law | नवापूर येथील वकील महिलेचा सासरकडून छळ

नवापूर येथील वकील महिलेचा सासरकडून छळ



लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वकीली करणार उच्च शिक्षित महिलेचा सासरी सुरत येथे छळ केल्याप्रकरणी पतीसह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर येथील माहेर असलेल्या छाया अनंत शाह या वकील महिलेचा विवाह १९९६ साली सुरत येथील अनंत शाह यांच्याशी झाला होता. विवाहाच्या तीन महिन्यानंतर सासरची मंडळी त्यांनी घर खर्चासाठी माहेरून पैसे आणावे, घरात पैसे द्यावे यासाठी छळ करीत होते. शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी देत होते.
या छळाला कंटाळून अखेर छाया शाह यांनी नवापूर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अनंत शाह, अरुण शाह, मंगळ शाह, पुष्पाबेन शाह, अरविंद शाह, साधना शाह, अजय शाह, निर्भयकुमार शाह, रेखाबेन शाह, अलका शाह, बिना मेहता, सुवर्णा पटेल, गजेंद्र शाह, सपनेश मेहता, सन्मुखलाल शाह सर्व रा. भटार, सुरत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार पवार करीत आहे.

Web Title: Lawyer from Navapur harassed by father-in-law