बांधावर खत पुरवठा मोहीम योजनेचा चितवी येथे शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST2021-07-04T04:21:05+5:302021-07-04T04:21:05+5:30

यावेळी तालुका कृषी अधिकारी बापू गावीत, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी राऊत, कृषी पर्यवेक्षक हरिदास पवार, कृषी सहायक उर्मिला गावीत, ...

Launch of Fertilizer Supply Campaign Scheme at Chitvi | बांधावर खत पुरवठा मोहीम योजनेचा चितवी येथे शुभारंभ

बांधावर खत पुरवठा मोहीम योजनेचा चितवी येथे शुभारंभ

यावेळी तालुका कृषी अधिकारी बापू गावीत, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी राऊत, कृषी पर्यवेक्षक हरिदास पवार, कृषी सहायक उर्मिला गावीत, चितवी गावातील शेतकरी दिनेश गावीत, उत्तम गावीत व इतर शेतकरी उपस्थित होते. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत बांधावर खत पुरवठा मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी संरक्षित असलेला युरियाचा साठा नवापूर तालुक्यासाठी मंजूर करून दिला आहे. मंजूर साठा नवापूर तालुक्यातील आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गटांमार्फत शेतकर्‍यांना वाटप करण्यासाठी पुरविण्यात येत आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या वितरकांद्वारे खताचा साठा पुरविण्यात येत आहे. नवापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना ऊस, कापूस व खरीप हंगामातील इतर पिकांना वापरासाठी खत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार व कृषी विकास अधिकारी यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.

Web Title: Launch of Fertilizer Supply Campaign Scheme at Chitvi