पाचोराबारी येथून तरुणीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:08 IST2020-06-19T12:08:41+5:302020-06-19T12:08:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : २१ वर्षीय तरुणीस पाचोराबारी येथून युवकाने पळवून नेल्याची फिर्याद तरुणीच्या वडिलांनी नंदुरबार उपनगर पोलिसात ...

Kidnapping of a young woman from Pachorabari | पाचोराबारी येथून तरुणीचे अपहरण

पाचोराबारी येथून तरुणीचे अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : २१ वर्षीय तरुणीस पाचोराबारी येथून युवकाने पळवून नेल्याची फिर्याद तरुणीच्या वडिलांनी नंदुरबार उपनगर पोलिसात दिली आहे. रनाळेखुर्द, ता.नंदुरबार येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगम मंगलसिंग चौरे, रा.रनाळेखुर्द, ता.नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. याबाबत तरुणीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पाचोराबारी येथील २१ वर्षीय तरुणीला निगम चौरे याने २ जून रोजी पाचोराबारी येथील घरूनच काहीतरी फूस लावून पळवून नेले. तरुणीचा व तरुणाचा ठिकठिकाणी शोध घेतला असता ते मिळून आले नाही.
त्यामुळे तरुणीच्या वडिलांनी नंदुरबार उपनगर पोलिसात फिर्याद दिल्याने निगम चौरे याच्याविरुद्ध तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला फौजदार राजपूत करीत आहे.

Web Title: Kidnapping of a young woman from Pachorabari