शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खेडदिगर वनउपज तपासणी नाके निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या खेडदिगर येथे अवैध वृक्षतोड व वाहतूक रोखण्यासाठी वनउपज ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या खेडदिगर येथे अवैध वृक्षतोड व वाहतूक रोखण्यासाठी वनउपज तपासणी नाका आहे. परंतु याठिकाणी कुणीही अधिकारी वा कर्मचारी फिरकत नसल्याने हा नाका रामभरोसे बनला आहे.मध्य प्रदेशच्या सीमेवर लाकूड तस्करी रोखण्यासाठी खेडदिगर येथे वनविभागाचा वनउपज तपासणी नाका आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेला हा नाका महत्वपूर्ण मानला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा नाका कार्यान्वित असला तरी याठिकाणी एकही अधिकारी वा कर्मचारी फिरकत नसल्याने वनउपज नाका रामभरोसे बनला आहे. या वनउपज तपासणी नाक्याजवळून मोठया प्रमाणावर अवैध लाकडाची तस्करी केली जाते. परंतु आजपर्यंत लाकूड तस्करीची एकही कारवाई झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून होणारी लाकूड तस्करीवर आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.संरक्षण कुंपणची दुर्दशाया वनउपज नाक्याचे कार्यालय व कर्मचारी निवासस्थानांना संरक्षण कुंपन बनविले आहे. मात्र कुपंणाची दुर्दशा झाल्याने येथे मोकाट गुरांचा नेहमी वावर असतो तर काहींनी रात्रीच्या बैठका व इतर गोष्टीसाठी याचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे याठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.निवासस्थान धूळखातखेडदिगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर नेमणुकीला कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, शौचालय बांधण्यात आले आहे. परंतु याठिकाणी अधिकारी किंवा कर्मचारीच फिरकत नसल्याने हे निवासस्थान धूळखात पडले आहे. तसेच कार्यालय व निवासस्थान परिसरात घाणीचे साम्राज्यही निर्माण झाले आहे.