शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १२ टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या, पावसाअभावी लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

तृणधान्य पिकामध्ये २ हजार १७९ हजार हेक्टरवर भात, ३ हजार ९५२ हेक्टर ज्वारी, २४ हेक्टर बाजरी, ६ हजार ६१ ...

तृणधान्य पिकामध्ये २ हजार १७९ हजार हेक्टरवर भात, ३ हजार ९५२ हेक्टर ज्वारी, २४ हेक्टर बाजरी, ६ हजार ६१ हेक्टरवर मका, २ हजार ६१० हेक्टर तूर, १५ हेक्टरवर मूग, १ हजार ४१८ हेक्टर उडीद, १४३ हेक्टर भुईमूग, १० हेक्टर सूर्यफूल आणि १ हजार १९२ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात दरवर्षी सर्वाधिक लागवड क्षेत्र हे कापसाचे असते. यंदाही कापूस लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज होता. परंतु निर्धारित १ लाख ५ हजार ६६१ हेक्टरपैकी अद्याप केवळ १७ हजार ४५३ हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ १६ टक्के कापूस लागवड पूर्ण करण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कापूस लागवडीचे क्षेत्र पाऊस पडल्यानंतर वाढण्याचा अंदाज असला तरीही गेल्या दोन वर्षात पडलेला कापसाचा दर आणि लाॅकडाऊनमुळे कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागलेली कसरत यामुळे शेतकरी यंदा कापसाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

पावसाअभावी पेरण्या लांबल्याचे सांगण्यात येत असतानाच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतीच्या खर्चात १० ते १५ टक्के वाढ झाल्याची माहिती दिली जात आहे. यामुळेही शेतीकामांना ब्रेक बसल्याची माहिती दिली जात आहे. जिल्ह्यातील विविध भागात अद्याप पेरण्यांना पूर्ण भरात सुरुवात झालेली नसली तरी सात जुलैनंतर वेळोवेळी पाऊस कोसळल्यास पेरणीचे आकडे वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.