शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

अतिदक्षता विभाग सुसज्ज ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : परदेशासह देशाच्या विविध राज्यांमध्ये शिक्षणानिमित्त व उद्योग व्यवसायासह नोकरीनिमित्त राहणाऱ्या शहादेकर नागरिकांची संख्या जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : परदेशासह देशाच्या विविध राज्यांमध्ये शिक्षणानिमित्त व उद्योग व्यवसायासह नोकरीनिमित्त राहणाऱ्या शहादेकर नागरिकांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. देशात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असल्याने सर्वत्र लॉकडाऊनसारखी परिस्थिती असल्याने विविध भागात राहणारे नागरिक येत्या काही दिवसात शहाद्यात मोठ्या संख्येने येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शहरातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.शहादा शहरात खाजगी रुग्णालयांची संख्या सर्वाधिक असून बहुतांश रुग्णालयाकडे अद्ययावत अतिदक्षता विभाग कार्यरत आहेत. राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण सर्वाधिक आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १४४ कलम लागू करून लोकांचे आदेश दिले आहेत. राज्यातील अनेक विद्यार्थी मुंबई-पुणे व राज्याच्या इतर भागात शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे अनेक नागरिक उद्योग-व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. ते शहाद्याकडे परत येत आहेत. गेल्या आठवड्यात अनेक नागरिक व विद्यार्थी परदेशासह मुंबई, पुणे येथून शहाद्यात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शहरातील खाजगी रुग्णालयांशी संपर्क साधून तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून अतिदक्षता विभागातील आयसोलेशन बेड तयार करण्यासह आवश्यक ती यंत्रसामग्री व व्हेंटीलेटर तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याठिकाणी शासकीय वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचे पथक कार्यरत असणार असून ते संबंधित संशयित कोरोनाग्रस्त रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेतील. राज्यात पुणे, मुंबई व नागपूर या तीन ठिकाणी तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. दुर्दैवाने तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यास या अतिदक्षता विभागात संबंधित रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा केली जाणार आहे.दरम्यान, परदेशातून व राज्यासह परराज्यातून शहाद्यात परतणाºयांची संख्या गेल्या चार-पाच दिवसात वाढली आहे. अशा नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आपापली वैद्यकीय तपासणी स्वत:हून करून घ्यावी. त्याचप्रमाणे पुढील १५ दिवस कुठल्याही सार्वजनिक उपक्रमात शोभायात्रा व कार्यक्रमात हजर राहू नये. जे विद्यार्थी व नागरिक या आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.