के.डी. गावित माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:10+5:302021-02-05T08:07:10+5:30

वनवासी माध्यमिक नवापूर : तालुक्यातील शेही येथील नेसू सेवा शिक्षण संस्था संचालित वनवासी माध्यमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ...

K.D. Republic Day celebrated at Gavit Secondary School | के.डी. गावित माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

के.डी. गावित माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

वनवासी माध्यमिक

नवापूर : तालुक्यातील शेही येथील नेसू सेवा शिक्षण संस्था संचालित वनवासी माध्यमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक अंतर ठेवून ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे माजी अध्यक्ष रमेश वळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपसचिव मंत्रालय प्रकाश वळवी, जालमसिंग वसावे, पोलीस उपनिरीक्षक जगन वळवी, मुख्याध्यापिका एस. एफ. गावित, आर. के. दशपुते आदींसह ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महात्मा जोतिबा फुले हायस्कूल

नंदुरबार : शहरातील महात्मा जोतिबा फुले हायस्कूल नंदुरबार येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक डी.एच. पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक डी.एच.पवार यांनी मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्य चळवळीतील मोहिमांबद्दल मत मांडले. यावेळी वसतिगृहाचे अधीक्षक कैलास धोडसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. ई. निकुंबे यांनी केले.

Web Title: K.D. Republic Day celebrated at Gavit Secondary School