शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राजरंग- आदिवासी मंत्र्यांच्या वकालतीला न्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:34 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्याचे आदिवासी विकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांचा बोगस आदिवासी विरूद्ध सुरू ...

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याचे आदिवासी विकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांचा बोगस आदिवासी विरूद्ध सुरू असलेल्या लढ्याला एका निकालात सर्वेाच्च न्यायालयात न्याय मिळाला आहे. मंत्री पाडवी हे स्वत: वकील असल्याने त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे. आदिवासींच्या न्याय हक्काचा व अधिकाराच्या पश्नावर ते सुरूवातीपासून लढत आहेत. लोकनेता पेक्षा सामाजिक चळवळीतील कार्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ३० वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारणात राहूनही त्यांनी एक राजकीय नेत्यापेक्षा आपल्या व्यक्तीमत्त्वाची वेगळी छाप उमटविली आहे. गोवारी हे आदिवासी जमातीत समाविष्ट असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठाने २०१८ मध्ये निकाल दिला होता. अर्थात त्यापूर्वी गोवारी समाजाचा लढा, विराट मोर्चा आणि त्यात १०२ जणांचे गेलेले बळी ही दुर्देवी घटना महाराष्ट्राला ज्ञात आहे. या घटनेमुळे तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांना राजीनामा द्यावा लागला होता. या घटनेनंतर गोवारी समाजाचा लढा अधिक तीव्र झाला होता. या संदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर न्यायालयाने गौंड गोवारी असलेले सर्वजण गोवारी असल्याचा व गोवारी आदिवासीच असल्याचा निकाल दिला होता. त्याच्या विरूद्ध केंद्र सरकार, राज्य सरकार व गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. दोन वर्षे या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यात ॲड.के.सी. पाडवी यांचे मोठे योगदान होते. सर्वोच्च न्यायालयातील या लढ्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. अखेर न्यायालयात त्यांंना दाद मिळाली. त्यामुळे के.सी. पाडवी यांना आदिवासींची सहानुभूतीही मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सोशल मिडियावर बहुतांश आदिवासी संघटनांनी ॲड.पाडवी यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या कायद्याच्या अभ्यासाचीही दाद दिली आहे. वन गावांसदर्भातदेखील त्यांचा सुरूवातीपासून लढा आहे. या प्रकरणी त्यांनी दिल्लीतही उपोषण केले होते. जिल्ह्यातही स्वत: आंदाेलन केले होते. या प्रकरणावर सरकारने तात्पुरता दिलासा देणारी भूमिका घेतली होती. मात्र त्याला त्यांनी विरोध करून या प्रकरणीही ते कायदेशीर लढा देत आहेत. आदिवासींच्या संस्कृतिचा अभ्यासही मुळाशी जावून त्यांनी केला आहे. यामुळे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रतिमा उजळ झाली आहे. अशीच प्रतिमा आदिवासी विकासमंत्री म्हणूनदेखील त्यांनी निर्माण करावी, असाही सूर व्यक्त होत आहे. सलग सात वेळा आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळाले आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे काम करण्यास निश्चित बंधणे आले आहेत. मात्र आता कामात गती यावी, अशी अपेक्षा आदिवासींमधून व्यक्त होत आहे. त्यांनी सुरू केलेली महत्वकांक्षी खावटी योजना अद्याप आकारास आलेली नाही. अनेक तांत्रिक अडचणी व निधीमुळे सहा महिन्यांपासून ही योजना हेलकावे खात आहेत. लाॅकडाऊनच्या काळात आदिवासी विकास विभागातील या योजनेची मदत राज्यातील साडे अकरा लाख कुटुंबांना आधार देणारी होती. परंतु सहा महिने केवळ प्रतिक्षेतच गेले. अनेक कुटुंब प्रतिक्षा करून रोजगारासाठी परराज्यात स्थलांतरीत झाले. नव्हे तर या योजनेच्या लाभासाठी जेव्हा आश्रमशाळेतील शिक्षक व सरकारी यंत्रणा लाभार्थींकडे जात आहेत त्या वेळी लाभार्थी या यंत्रणेला खरच लाभ मिळणार की नाही? असा प्रश्न करीत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्याही योजनेवरून विश्वास डळमळीत होत आहेत. अशा स्थितीत खावटी योजनेची अंमलबजावणी किमान नवीन वर्षाच्या सुरूवातीला तरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या शिवाय आदिवासी भागातील विकासाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यावर मंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी आपल्या कामाची छाप उमटवून कामांना गती द्यावी व पिढ्यानपिढ्यांपासून उपेक्षित राहिलेल्या आदिवासी बांधवांना विकासाची नवीन दिशा द्यावी, हीच अपेक्षा सुशिक्षित तरूण आदिवासींची त्यांच्याकडून लागून आहे.