हिमतीनेच शववाहिका चालकांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST2021-04-28T04:33:05+5:302021-04-28T04:33:05+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात मार्च महिन्यात वाढलेल्या कोरोना संसर्ग बाधित रुग्णांमध्ये हाहाकार उडाला होता. यातून यंत्रणांचे कामकाज वाढले होते. यात ...

The journey of the hearse driver with confidence | हिमतीनेच शववाहिका चालकांचा प्रवास

हिमतीनेच शववाहिका चालकांचा प्रवास

नंदुरबार : जिल्ह्यात मार्च महिन्यात वाढलेल्या कोरोना संसर्ग बाधित रुग्णांमध्ये हाहाकार उडाला होता. यातून यंत्रणांचे कामकाज वाढले होते. यात रुग्णवाहिका व शववाहिका चालकांच्या कामांचे तास वाढून त्यांना उपाययोजनांविनाच धावपळ करावी लागत आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांतून जिल्हा कोविड हाॅस्पिटलपर्यंत रुग्ण आणून सोडणे आणि शववाहिकांमधून मृतदेह स्मशानभूमीत नेण्याच्या कामांमुळे रुग्णवाहिकांना महत्त्व आले आहे. जिल्ह्यातील विविध मार्गांवर सध्या रुग्ण वाहून नेणाऱ्या रुग्णवाहिका दिसून येत आहेत. या रुग्णवाहिकांवर काम करणाऱ्या चालकांनाही कोरोना संसर्ग झाल्यानंतर अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज सुरू आहे. नगरपालिका तसेच खासगी रुग्णालयाकडून चालवल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकांवर चालक असले तरी अनेक वेळा या चालकांचे कामाचे तास अधिक झाल्याने त्यांचेही हाल होत असल्याचे दिसून आले.

गेल्या एक वर्षापासून कोरोनाचे रुग्ण ने-आण करत आहे. प्रत्येक वेळी पीपीई कीट बदलणे शक्य होत नव्हते. उकाड्यामुळे वाहन चालवताना पीपीई कीट घालणेही शक्य होत नाही. यातून हाल होतात. परंतु तरीही काम करत आहे.

- रुग्णवाहिका चालक, जिल्हा रुग्णालय, नंदुरबार

गेल्या वर्षात कोरोना संसर्ग झालेल्यांचे मृत्यू सुरू झाल्यापासून त्यांचे शव स्मशानभूमीपर्यंत पोहोचवत आहे. पीपीई कीट किंवा इतर साधने उकाड्यामुळे निरुपयोगी ठरतात. स्वत:ची काळजी घेत वाहन चालवून कामकाज करत आहे. पुढे करत राहू.

-शववाहिका चालक, नंदुरबार

Web Title: The journey of the hearse driver with confidence