शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात जैन समाजातर्फे शोभायात्रेने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात पद्मभूषण पूज्यपाद राष्ट्रीय संत जैन आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा यांची अंबाजीनगर येथील राजस्थानी मंगल ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात पद्मभूषण पूज्यपाद राष्ट्रीय संत जैन आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा यांची अंबाजीनगर येथील राजस्थानी मंगल कार्यालयापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेत दाऊदी बोहरा समाजाच्या बुºहानी बॅण्ड पथकाने स्वागत गीत सादर केले. पद्मभूषण रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा यांच्यासह साधुसंत व शहरातील सकल श्री संघ जैन समाजातील महिला-पुरूष हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी जय महावीर नामाचा जय जय जयकार करण्यात आला. या शोभायात्रेचे सकल जैन समाजाच्या व्यावसायिकांनी स्वागत करून महाराज यांचे पूजन केले. शोभायात्रेत युवतींनी डोक्यावर कळस घेतले होते.पदयात्रा खेतिया रोडमार्गे महात्मा गांधी पुतळा, जुन्या तहसील कार्यालय, डोंगरगाव रोड, पटेल रेसिडेन्सीमार्गे थेट श्री सुघोषा घंट मंदीर येथे आल्यावर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यानंतर मंगल प्रवचन झाले असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. परिवर्तन प्रवचन मालेत पद्मभूषण राष्ट्रीय संत रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी सांगितले की, महाभारतातील धृतराष्ट्र, शकुनी व दुर्योधन यांच्या कुटिलता, इर्षा व अंधपणा या तीन गोष्टींमुळे महाभारत घडले आहे. ज्यांच्याकडे विवेक आहे तोच व्यक्ती पुढे जाऊ शकतो, वाईट सोडून चांगल्या गोष्टींचे आचरण करणे यालाच विवेक असे म्हणतात. धृतराष्टÑाकडे विवेक नसल्याने महाभारतात अनेक गोष्टी घडून आल्या. घराच घरपण टिकवण्यासाठी घरातील मुख्य व्यक्तीने कुटुंबाशी कधीही खोट बोलू नये, संसार करीत असताना पुण्य-पाप कर्म येणार, मात्र आपण चालत असताना आपल्या सद्सदविवेकबुद्धीला चांगली चालना दिल्यास वाईट कृतीपासून लांब राहणार आहोत. दुसऱ्यांचा हेवा करू नका, कोणालाही ओव्हरटेक करत असताना आपण एकटे पडू यासाठी आपली विवेक बुद्धी शाबूत ठेवून कुठलेही काम करावे. समाजातील व्यक्तींची मानसिकता ३५ ते ४० वर्षापर्यंत पैसे कमवण्याची व त्यानंतर परमेश्वराला आठवण करण्याची आहे यात बदल झाला पाहिजे असे सांगितले. यांनतर बालगोपालांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमास शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचा भाविकांनी घ्यावा, असे श्री जैन स्वेतांबर मुर्तीपूजा शहादा तसेच श्री सकल जैन संघ शहादा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.