जिल्ह्याबाहेर जाणारे व येणाऱ्यांसाठी दिशानिर्देश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:43 IST2020-05-04T12:43:34+5:302020-05-04T12:43:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातून परराज्यात जाणारे, इतर जिल्ह्यातून व राज्यातून जिल्ह्यात येणाºया व्यक्तींबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ...

Issued guidelines for those coming and going outside the district | जिल्ह्याबाहेर जाणारे व येणाऱ्यांसाठी दिशानिर्देश जारी

जिल्ह्याबाहेर जाणारे व येणाऱ्यांसाठी दिशानिर्देश जारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातून परराज्यात जाणारे, इतर जिल्ह्यातून व राज्यातून जिल्ह्यात येणाºया व्यक्तींबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार परत ई पाससाठी अर्ज करता येणे नागरिकांना शक्य होणार आहे़
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातून मुळ गावी जावू इच्छिणाºया व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची माहिती त्या तालुक्यातील तहसीलदार एकत्रित करणार आहेत़ या माहितीत आधार, दूरध्वनी क्रमांक व पत्ता, ज्या ठिकाणी जायचे आहे ते स्थळ आणि वाहनाच्या प्रकाराचा उल्लेख करावा लागणार आहे़ गटाच्या बाबतीत गटप्रमुख अर्ज करू शकतील. वैद्यकीय अधिकाºयाचे शीतज्वर नसल्याचे प्रमाणपत्र व्यक्तीनिहाय आवश्यक असेल. ई-पाससाठी http://covid-19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
या संपूर्ण प्रक्रियेसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नोडल अधिकारी राज्य आणि जिल्हानिहाय यादी तयार करून ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात जायचे आहे तेथील नोडल अधिकाºयासंोबत समन्वय साधणार आहेत़ स्वत:च्या वाहनाने जाणाºया व्यक्तींनाबाबत नोडल अधिकारी समन्वय साधून जाण्याची परवानगी देतील. वाहनासाठी परवाना तयार करून त्यावर प्रवासी व्यक्ती व मार्गाचा उल्लेख राहणार आहे़

दरम्यान रेड झोनमधून नंदुरबार शहर किंवा जिल्ह्यात येणाºया व्यक्तीला परवानगी देण्यासंदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यात येणाºया व्यक्तींना वैद्यकीय तपासणी करुन १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे़ बाहेरची वाहने चेकपोस्टजवळ आल्यानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहणार आहे़ परत येणाºयांनी रेड झोन किंवा प्रतिबंधित क्षेत्रात मुक्काम किंवा प्रवास करु नये असेही आदेशात म्हटले आहे़

Web Title: Issued guidelines for those coming and going outside the district